कोरोनामुळे पी.डी.पाटील पूण्यतिथी कार्यक्रम रद्द - जशराज पाटील

कोरोनामुळे पी.डी.पाटील पूण्यतिथी कार्यक्रम रद्द - जशराज पाटील
कराड: पत्रकार परिषदेत माहिती देताना जसराज पाटील

कराड/प्रतिनिधी : 
          सध्या शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही परिस्थिती पाहता 17 सप्टेंबर रोजी साजरा होणारा आदरणीय पी. डी. पाटील साहेबांच्या पूण्यतिथीचा सार्वजनिक कार्यक्रम कोरोनामुळे रद्ध करण्यात आल्याची माहिती सह्याद्री सह. साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांनी दिली. 
           येथील शिवाजी हायस्कूलमध्ये सोमवारी 14 रोजी सायंकाळी 4 वाजता  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पी. डी. पाटील प्रतिष्ठानचे पदाधिकारी ए. एन. मूल्ला, अॅड. मानसिंगराव पाटील उपस्थित होते.