कोर्टीजवळ ट्रक-कार अपघातात दोन महिला जागीच ठार

कोर्टीजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावर गुरुवारी पहाटे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर दोन जण गंभीर आणि दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

कोर्टीजवळ ट्रक-कार अपघातात दोन महिला जागीच ठार
कोर्टीजवळ ट्रक-कार अपघातात दोन महिला जागीच ठार 
 
दोन गंभीर, तर दोन किरकोळ जखमी 
 
कराड/प्रतिनिधी : 
           कोर्टी ता. कराड पुुणे- बेंगलोर महामार्गाच्या साईडपट्टीवर पार्किंग केलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दोन महिला जागीच ठार झाल्या. तर दोन जण गंभीर असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. गुरुवारी 11 रोजी पहाटेच्या सुमारास सातारा-कराड लेनवर हा अपघात झाला. 
          अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे. अपघातातील मृतांसह जखमी झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 
          याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोर्टीजवळ पुणे-बंगलोर महामार्गावर सातारा-कराड लेनवर महामार्गाच्या साईडपट्टीवर पार्किंग केलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा कारने 
जोरदार धडक दिली. या कारमध्ये एकुण सहा प्रवासी होते. त्यातील दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर दोन जण गंभीर असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. 
        दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग व उंब्रज पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.