चोरे विभागातील 19 कोरोनाबधित रुग्णांसह ,आज अखेर एकूण बधितांची संख्या झाली 53

चोरे विभागातील 19 कोरोनाबधित रुग्णांसह ,आज अखेर एकूण बधितांची संख्या झाली 53

उंब्रज/प्रतिनिधी

मार्च महिन्यापासून कोरोना महामारीला चार हात लांब ठेवणाऱ्या चोरे विभागाचे गत आठ दिवसातील कोरोना बाधित रुग्णाचे आकडे चिंता वाढवणारे ठरले आहेत, यामध्ये बुधवार दि.5 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोली यांच्या मार्फत चोरे येथे राबवण्यात आलेल्या RAT कोरोना चाचणी शिबिरात 25 जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते.तर शनिवार दि 8 ऑगस्ट रोजी घेतलेल्या दुसऱ्या कोरोना चाचणी शिबिरात 18 जण कोरोनाबधित आले आहेत व अगोदर केलेल्या चाचणी मध्ये 10 जण पॉझिटिव्ह असे एकूण मिळून 53 जण कोरोनाबधित असल्याची माहिती इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुजाता माने यांनी दिली आहे.

चोरे परिसरातील एका कारखान्यात निदर्शनास आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नंतर या कारखान्यातील कर्मचारी व त्यांच्या संपर्कातील रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची संख्या जवळपास नऊच्या आसपास झाली होती यामुळे 5 ऑगस्ट रोजी इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत डॉ सुजाता माने यांनी चोरे परिसरातील लोकांच्या साठी कोरोना चाचणीचे रॅपिड अँटी टेस्ट(RAT)शिबीर आयोजित केले.यामध्ये चोरे परिसरातील 99 ग्रामस्थांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या यातील चोरे येथील 21 जण तर धावरवाडी येथील 4 जण कोरोनाबधित आले होते असे मिळून 5 ऑगस्ट रोजीचा कोरोनाबधित रुग्णांचा आकडा 25 असल्याची माहिती डॉ सुजाता माने यांनी दिली.

या 25 कोरोनाबधित रुग्णांच्या हाय रिस्क मधील निकट सहवासातील 91 जणांचे कोरोना चाचणी शिबीर हे 8 ऑगस्ट रोजी चोरे येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये चोरे येथील 16 जण धावरवाडी येथील 1 व कोरीवळे येथील 1 जण कोरोनाबधित असल्याचे निदर्शनास आले आहेत यामुळे चोरे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 53 झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ सुजाता माने यांनी दिली आहे तसेच सर्व कोरोना बाधित रुग्णांना कराड येथे पुढील उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती दिली.

----------------------------------------------

इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने चोरे येथे चार दिवसात दुसरे कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये 91 हाय रिस्क संपर्कातील लोकांची तपासणी केली यामध्ये पाल,धावरवाडी,व चोरे येथील नागरिक होते.चोरे येथील 16,धावरवाडी येथील 1 गरोदर महिला,तर कोरिवळे येथील 1 जण व 1 जण कारखान्यातील कोरोनाबधित असल्याचे निदर्शनास आले चोरे विभागाची एकूण कोरोनाबधित लोकांची संख्या 53 झाली आहे.

डॉ.सुजाता माने
वैद्यकीय अधिकारी इंदोली