मनोमिलनाचा फटका

मनोमिलनाचा फटका

मनोमिलनाचा फटका


कृष्णेची निवडणूक म्हटली की संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागायचे. हा कारखाना कुणाच्या ताब्यात जाणार आणि कुणाच्या ताब्यात राहणार. यावर कृष्णाकाठी पैजा लागायच्या. त्याच बरोबर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील राजकीय नेते कोणत्या पॅनेलच्या पाठीशी आहेत. यावरही कारखान्याचे समीकरण ठरायचे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कराड दक्षिण आणि वाळवा तालुक्याचा मोठा सहभाग असायचा. याच बरोबर भिलवडी-वांगी मतदार संघातील ही गावांचा समावेश असल्याने. तेथील ही भूमिका महत्त्वाची असायची. शिराळा आणि कराड उत्तर चा समावेश ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राहिला आहे. यामुळे कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे असून उंडाळकर आणि जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे कायम लक्ष केंद्रीत व्हायचे. 2005 च्या निवडणूकीत सहकार पॅनेलचे नेतृत्व करणारे सुरेशबाबा यांना एक वर्षाचा कालखंड जादा मिळाला असल्याने. त्यांनी सभासदांशी चांगल्या प्रकारे संंपर्क ठंवला होता. तर त्याला सामोरे जाणारे रयत पॅनेलचे नेतृत्व मदनदादांच्याकडे होते. डॉ. इंद्रजित मोहिते यांची उमेदवारी होती.


     दोन पॅनेलमध्ये   संघर्ष झाला . आणि कारखान्यात संत्तांतर झाले. एक डॉक्टर गेले (सुरेशबाबा) आणि दुसरे डॉक्टर (इंद्रजितबाबा) चेअरमन झाले. इंद्रजितबाबांच्यावर भाऊंच्या विचाराचा पगडा होता. परखड मत व्यक्त करत कारखान्याचा हिताचा निर्णय घेण्यावर त्यांचा भर होता. कामगारांनी चुकारपणा केलेला त्यांना आजिबात आवडत नव्हता. त्याच बरोबर त्यांनी कामकाज करताना डिस्लरीचे विस्तारिकरण करण्यावर भर दिला. त्याच बरोबर त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा 16 मेगा वॅट क्षमतेचा सहविजनिर्मिती प्रकल्प त्यांनी आपल्या कारकिर्दीत उभा केला. ते करत असताना प्रत्येक गोष्टीवर त्यांचे बारीक लक्ष होते. बहुतांशी वेळ हे स्वतःत्या ठिकाणी जाऊन पाहणी करत असत. हा महत्त्वकांक्षी प्रकल्प उभा राहिल्याने कृष्णेच्या प्रगतीत आणखी एक मोठा प्रकल्प उभा राहिला.

याच बरोबर मिथेन गॅस प्रकल्प आणि प्रदुषण नियंत्रणाचा प्रश्नही सोडवण्यासाठी त्यांंनी प्रयत्न केला. त्यांनी कारखान्याचे कामकाज चांगल्या पद्धतीने केलेे मात्र त्यांच्या कारकीर्दीमध्ये 14 रूपये 40 पैसे दराने सभासदांना साखर देण्याचा निर्णय हा त्यांच्या कारकीर्दीला मारक ठरला पुन्हा याचा दर 7 रूपयेने करण्यात आला पण ते सभासदांना पटले नाही. त्याच बरोबर त्यांनी एकीकडे कारखान्याचे उत्पन वाढीचे प्रकल्प उभे केले त्यामुळे सभासदांच्या ऊसाच्या दरामध्ये वाढ झाली. ही वाढ इतर कारखान्यापेक्षा जास्त होती. त्यांनी 100 रूपये बील कमी दिले असा आरोप त्यांच्यावर झाला किंबहुना तो विरोधकांनी सभासदांच्या गळी उतरवला देखील. पण प्रत्यक्षात हे बिल कमी झाले नव्हते तर अंतिम बिल देताना ती रक्कम अदा केली होती.

साखरेचा आणि ऊसाच्या दराचा मुद्दा चांगलाच गाजत असतानाच 2010 च्या निवडणूकीला सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी काही निर्णय घेतले त्या निर्णयांनी कदाचित त्यांना या निवडणूकीत फटका बसला असवा. तब्बल 21-22 वर्षाचा मोहिते-भोसलेंचा संघर्ष मिटवून कृष्णाकाठी मनोमिलन झाले. मोहिते-भोसले एकत्रित आले. मोहितेंनी कारखाना पहावा आणि इतर राजकारण भोसलेंनी पहावे असा अलिखीत करारही झाला

अशी चर्चा कृष्णाकाठी रंगली. सभासदांना हे मनोमिलन रूचले नाही. आम्ही लाट्या-काठ्या खाल्ल्या, एकमेकांच्यात संघर्ष केला आणि यांना वाटले म्हणून हे दोघे एकत्रित झाले आम्ही ते का स्वीकारायचे असा पवित्रा कृष्णाकाठी चर्चिला जाऊ लागला. अशातच आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांनी मोहिते-भोसले यांच्य मनोमिलना विरोधात आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची आरोळी ठोकली. त्यांनी गावेगावी सभासदांशी संपर्क सुरू केला. मनोमिलनाची खदकर या निवडणूकीत मोहिते-भोसलेंना महागात पडली.

कृष्णाकाठी तिसरे नेतृत्व उदयास आले. अविनाश मोहितेंच्या संस्थापक पॅनेलने नवखे सभासद उभे करून पॅनेल निवडणूक रिंगणात उतरवले अणि कृष्णाकाठी पुन्हा एक इतिहास घडला. मनोमिलनाचे पॅनेल पराभूत झाले. अविनाश मोहितेंच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्ता हस्तगत केली. अविनाश मोहिते कारखान्याचे चेअरमन झाले. मोहिते-भोसलेंचे मनोमिलन कृष्णाकाठी रूचले नाही. हेच या निवडणूकीच्या निकालातून स्पष्ट झाले.    


क्रमश...