कृष्णेच्या निवडणुकीत विश्वजीत कदमांची ‘एन्ट्री’

डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पाठिशी ठाम ः निवडणुकीचे फुंकले रणशिंग

कृष्णेच्या निवडणुकीत विश्वजीत कदमांची ‘एन्ट्री’

 

कृष्णेच्या निवडणुकीत विश्वजीत कदमांची ‘एन्ट्री’


डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पाठिशी ठाम ः निवडणुकीचे फुंकले रणशिंग


कराड/प्रतिनिधी:


यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता रंगत येऊ लागली आहे. निवडणुक रिंगणात तीन पॅनल असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री आणि भारती विद्यापिठाचे कार्यवाह विश्वजित कदम हे प्रचाराच्या रणनितीत उतरले आहेत त्यांनी प्रत्यक्ष या निवडणुकीत सहभागी होऊन साम, दाम, दंड व भेद या नितीचा अवलंब करुन हि निवडणुक सर्व ताकदीनिशी यशवंतराव मोहिते रयत पॅनलच्या पाठिशी उभे राहून लढवणार आहे. तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास विश्वजित कदम कोठेही कमी पडणार नाही. ही निवडणुक माझ्या रणनीतीने लढणार आहे असा नारा दिल्याने कृष्णेची निवडणुक गाजणार हे आता स्पष्ट झाले आहे.
इस्लामपूर (ता. वाळवा) येथे आज विश्वजित कदम यांनी आपली भुमिका काँग्रस कार्यकर्त्यां समोर स्पष्ट केली आणि ते प्रत्यक्ष निवडणुकीत उतरले. विश्वजीत कदमांच्या या एन्ट्रीने कृष्णाकाठ ढवळून निघनार हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी वाळवा तालुका काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या बैठकीत काही महत्वाच्या सुचना देताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक दिलाने यामध्ये सहभागी व्हावे असेही अवहान करत रणशिंग फुंकले. कृष्णेची निवडणुक आतापर्यंत सर्वांना एकतर्फी होईल अशी स्थितीत वाटत होती. जर दोन मोहितेंचे एकीकरण झाले तर निवडणुकीत रंगत येईल असा कयास कृष्णेच्या सभासदांनी बोलून दाखवला होता मात्र आता ती परिस्थिती राहिली नाही. ते आजच्या विश्वजीत कदमांच्या भुमिकेने स्पष्ट झाले.
कृष्णेची निवडणुक एकतर्फी होणार असा कयास काहींनी बांधला असून निवडणूक तिरंगी होत आहे म्हटल्यानंतर काहींनी सुटकेचा निश्वासही सोडला असतानाच विश्वजीत कदमांची एन्ट्री बरेच काही सांगून गेले. त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीटे रणशिंग फुंकतानाच काहिंना कानपिचक्याही दिल्या. तर काहिंना मदतीचे अवाहन केले. खरे तर कृष्णेची निवडणुक ज्यावेळी जाहिर झाली त्यावेळी सलग महिनाभर दोन मोहिते एकत्रित येणार यावर खलबते सुरु होते. डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्या एकीकरणाच्या बैठकीत काही वेळी विश्वजित कदमांची उपस्थिती होती. चर्चा रंगात आली उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरु झाली आणि कोठेतरी माशी शिंकली. आणि या एकिकरणाच्या चर्चेतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन मी आजपासून या एकीकरणाच्या चर्चेतून बाहेर जात असल्याची घोषणा केली. बाबा चर्चेतून बाहेर गेले. त्यांनी सलग दोन महिने कराड येथे तळ ठोकला होता. घोषणा केली व ते लगेच दुसर्‍या दिवशी मुंबईकडे रवाना झाले. बाबा निघुन गेल्याने चर्चा काही कालखंड थांबली होती.
बाबा मुंबईत गेले आणि त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे दिड तास चर्चा झाली. विविध विषयावर चर्चा केल्यानंतर कृष्णेचा विषय हा निघाला आणि पृथ्वीराज बाबांनी सर्व माहिती शरद पवार यांना दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे एक नेते त्याच दिवशी तातडीने कराडच्या विश्रामधाम वर आले. व अन्य एका नेत्याबरोबर त्यांची राजकिय खलबते झाली. यामुळे पुन्हा एकीकरणाची चर्चा होणार की स्वतंत्र निवडणुकाला सामोरे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आज अचानक विश्वजीत कदम यांनी कराड येथे येऊन एक गोपनिय बैठक घेतली. यावेळी काही काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. तर दोन दिवसापूर्वी त्यांनी उदयसिंह पाटील यांच्याशी एका हॉटेलमध्ये चर्चा केली होती. आणि तडक इस्लामपुरला गेले व काँग्रेस भवनात त्यांनी निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे. हे एकीकडे घडत असले तरी शरद पवार आणि पृथ्वीराज बाबा यांच्यात कृष्णेच्या निवडणुकीबाबत हे जरी समजू शकले नसले तरी जो पर्यंत काँग्रेस आपली भुमिका स्पष्ट करत नाही किंवा काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते कोणाच्या व्यासपिठावर दिसत नाहीत तोपर्यंत हे समजू शकणार नाही. याकरिता पृथ्वीराजबाब हे कराडात आल्यानंतर अन्य काही राजकिय गुपिते उलगडली जातील. त्यांनी जरी आपली भुमिका जाहिर केली असली तरी अद्याप पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्यांना काहीही सांगितले नाही.
आजपर्यंत कृष्णेच्या ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये साधारण 1989 पासून डॉ. पंतगराव कदम हे रयत पॅनलच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यांचा ज्या पद्धतीने या निवडणुकीत सहभाग असायचा त्याच पद्धतीने विश्वजीत कदमांनी आपली भुमिका ठेवल्याचे दिसत आहे. स्व. पंतगराव कदम यांच्या पश्चात कृष्णेची हि निवडणुक पहिलीच होत असून आपण कशातच मागे नाही अथवा डॉ. इंद्रजित मोहिते यांना एकांगी सोडणार नाही अशीच भुमिका विश्वजीत कदम यांनी घेतल्याचे या रणणीतीवरुन स्पष्ट होते.