कृष्णेच्या निवडणुकीत मोहित्यांचे एकीकरण धुसर

निवडणूकीच्या रिंगणात तीन पॅनेलची शक्यताःचर्चा अडकली

कृष्णेच्या निवडणुकीत मोहित्यांचे एकीकरण धुसर

कृष्णेच्या निवडणुकीत मोहित्यांचे एकीकरण धुसर


निवडणूकीच्या रिंगणात तीन पॅनेलची शक्यताःचर्चा अडकली


कराड/प्रतिनिधीः-


कोरोना महामारी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू झाली असून गेल्या काही दिवसांपासून कृष्णेच्या या निवडणूकीत दोन पॅनेल का तीन पॅनेल? अशी चर्चा रंगली आहे. संपूर्ण कृष्णाकाठ परिसराचे लक्ष लागले असताना दोन मोहिते गटांचे एकीकरण करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते अद्यापही करत आहेत. यामुळे या निवडणूकीत दोन पॅनेलची शक्यता वर्तवली जात असली तरी आजच्या घडामोडीवरून एकीकरण होणार की नाही हे आता धुसर झाले आहे. कदाचित येत्या एक-दोन दिवसामध्ये पुन्हा एक अंतिम बैठक होईल आणि त्यानंतरच समजेल कृष्णेच्या रंणांगणानात पॅनेल दोन का तीन? तीन पॅनेल झाले तर काराखान्याची निवडणूक आपणासाठी सोपी जाईल हे सहकार पॅनेलने ओळखून ठेवले आहे. त्यामुळे आजच्या घडामोडीवरून या रंणांगणात तीन पॅनेल होतील असे चित्र दिसत आहे.
यशवंराव मोहिते कृष्णा कारखाना हा राज्यामध्ये निवडणूकीच्या बाबतीत कायमच चर्चेचा विषय असतो. या कारखान्यात 1989 पासून आज अखेर संघर्ष उभा राहिला आहे. 2010 निवडणूक वगळता ज्या निवडणूका झाल्या आहेत. त्या मोहिते-भोसलेंच्या संघर्षातून झाल्या आहेत. 2010 ला मोहिते-भोसले यांचे मनोमिलन झाले मात्र कृष्णाकाठी हे सभासदांना पटले नाही. म्हणून नवक्या असणार्‍या अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनेलनी या दोन बलाद्ध शक्तीच्या विरोधात रणशिंग फुंकले व निवडणूक जिंकलीही. त्यानंतर मात्र 2015 ला मनोमिलनाला पुन्हा एकदा तिलांजली देत तीन पॅनेल निवडणूकीसाठी उभे ठाकली. यामध्ये मोहितेंचे रयत तर अविनाश मोहितेंचे संस्थापक आणि डॉ. सुरेश भोसलेंचे सहकार पॅनेल असा तिरंगी सामना झाला. यामध्ये तत्कालीन सत्ताधारी संस्थापक पॅनेलला केवळ सहा जागा मिळाल्या आणि कारखान्याच्या सत्तेवर डॉ. सुरेश भोसलेंच्या नेतृत्वाखालील सहाकर पॅनेल आले. रयत पॅनेलला मात्र या निवडणूकीत सभासदांंनी निवडणूकीत दूर ठेवले.


त्यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट सुरू असून रूग्णसंख्याही मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी असताना निवडणूक प्राधिकरणाने निवडणूकीचा कार्यक्रम 24 मे ला जाहीर केला. 25 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. अशातच ही निवडणूक काही कालखंड पुढे ढकलने गरजेचे होते. पण उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. खरेतर राज्याचे सहकार मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनीच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यसाठी आदेश पारीत केले आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयात शासनाच्या वतीने पुन्हा आपले म्हणने मांडणे गरजेचे होते. पण तसे झालेले नाही. ही निवडणूक प्रक्रिया आता सुरूच झाली आहे तर तिन्हिही पॅनेलच्या प्रमुखांनी निवडणुकीची तयारी केली आहे. कहींना आपले उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. कृष्णेच्या या निवडणूकीत दोन मोहितेंना एकत्रित आणून निवडणूकीसाठी दोनच पॅनेल व्हावेत या करीता सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पुढकार घेत डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्यात चर्चा घडविल्या. चर्चेच्या फैरी काल अखेर सुरूच होत्या अशातच आज डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आपल्या समर्थकांसह सुमारे 35 उमेदवारी अर्ज दाखल केले. यावरून कृष्णेची निवडणूक दुरंगी का तिरंगी या चर्चेला कृष्णाकाठी उधान आले आहे.


कृष्णेच्या यापूर्वीच्या निवडणूकीत मोहिते यांच्या रयत पॅनेलला डॉ. पतंगराव कदमसाहेब यांचे सहकार्य असायचे ते थेट निवडणूकीत सहभागी व्हायचे प्रचाराच्या सभा, बैठका करत असत. त्यांच्या निधनानंतर कृष्णेची ही निवडणूक पहिलीच होत आहे. ते ज्या पद्धतीने या निवडणूकीत सहभागी व्हायचे त्याच पद्धतीने त्यांचे सुपुत्र भारती विद्यापीठाचे कार्यवाहक राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदमही सहभागी झाल्याचे पहायला मिळत आहे. काँगे्रसच्या अनेक कार्यकार्त्यांच्या इच्छेखातिर त्यांनी अविनाश मोहितेंशी चर्चा केली व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबरही गुफ्तगु करत त्यांनाही या निवडणूकीसाठी सहभागी व्हा. आणि हे दोन गट एकत्रित आणून निवडणूक लढवूया असा प्रयत्न केला. यामुळे गेल्या 8 दिवसांपासून आधी कार्यकर्त्यांच्या बैठकीचा सिलसिला आणि नंतर नेत्यांच्या समवेत बैठक पार पडल्या. बैठकीत काही जागावरून ताण-तणाव निर्माण झाले. बैठक यशस्वीही झाली नाही आणि निष्फळही ठरली नाही. तर ती धुसर झाल्याचे दिसत आहे. आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आम्ही चर्चेसाठी आशादायी आहोत .. बैठका होवू द्यात. जे काय व्हायचे ते होईल असे सांगून आपण निवडणूकीसाठी सर्व गटातून उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. असे म्हटल्याने कृष्णेच्या या निवडणूकीत पॅनेल तीन? का अजून चर्चा होवून दोन? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी कृष्णाकाठला आणखी वाढ पहावी लागणार..