एकीकडे बैठका, दुसरीकडे पॅनल निश्चिती

कृष्णेच्या रणांगणांत दोन पॅनल की तीन पॅनल फैसला आज?

एकीकडे बैठका, दुसरीकडे पॅनल निश्चिती

एकीकडे बैठका, दुसरीकडे पॅनल निश्चिती

कृष्णेच्या रणांगणांत दोन पॅनल की तीन पॅनल फैसला आज?

कराड/प्रतिनिधीः


राज्याचे लक्ष लागलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होयला सुरुवात झाली तरी मोहितेंचे मिटेना आणि भोसलेंची रणनीती निश्चित. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन मोहिते गटांना एकत्रित आणण्यासाठी राजकिय खलबते सुरू आहेत बैठकांचे सत्रही सुरु आहेत. मात्र यातुन अद्याप कोणताच तोडगा निघाला नाही. काँग्रेसचे नेते हे दोन गट एकत्रीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत अंतिम निर्णय आज उद्या होऊ शकतो. त्याचवेळी समजेल कृष्णेच्या रणांगणांत दोन पॅनल का तीन पॅनल.


यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहिर झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात सुरु असून जिल्हा लॉकडॉऊन आहे. जिल्ह्यात जमावबंदी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशातच राज्यात सर्वात मोठा समजल्या जाणार्‍या कृष्णाचे निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. निवडणुकीसाठी माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते आणि विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे आपआपल्या रणनिती निश्चित करत आहे. तीनही नेत्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची सर्व तयार केली आहे. प्रत्येकाचे आपले पॅनल निश्चित आहे. उमेदवारीचे शिक्कामोर्तब करण्याचे काम सुरू आहे.


काँग्रेसचे नेते दोन मोहितेंना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्नशिल असून त्यांच्याही बैठका पार पडलेल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण हे अंतिम निर्णय घेणार आहेत. राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी यापुर्वीच आपण कृष्णेच्या निवडणूकीत सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे जाहिर केले आहे. वाटेल तेवढी सहकार्य व ताकद इंद्रजित मोहितेंच्या पाठिशी उभी करणार असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कराड दक्षिणचे युवा नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटीलहे ही या रणनितीत सहभागी आहेत. मोहितेंच्या बैठकाच पार पडत आहेत यातून काही फलित बाहेर पडलेले नाही. आज उद्या आघाडी होणार की नाही यावर शिक्कामोर्तब होईल आणि त्याच वेळी समजेल की कृष्णेच्या रणांगणांत पॅनल दोन का तीन!एकीकडे मोहितेंच्या बैठका सुरु असल्यातरी दुसरीकडे मात्र जयवंतराव भोसले सहकार पॅनलची रणणीती निश्चित झाली आहे. डॉ. सुरेश भोसले हे या पॅनेलचे नेतृत्व करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू आहे. सहकार पॅनलमधून निवडणुक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे.


कृष्णा हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून सुरेशबाबा अंतिम हात उमेदवारीच्या यादीवर फिरवत आहेत. विद्यमान संचालकापैकी थोडाफार बदल त्यांच्या पॅनलमध्ये होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात त्यांनी वाळवा तालुक्यातील बहुतांशी उमेदवारांची चाचपणी करत काहिंना उमेदवारी अर्ज भरण्याची सुचना केल्या आहेत. गतवेळी कारखान्याच्या निवडणुकीत तीन पॅनल आमने-सामने उभी राहिली होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलला केवळ सहा जागावर समाधान मानावे लागले होते. आणि सत्तांतर घडवत डॉ. सुरेश भोसले यांनी कारखान्याची सत्ता हस्तगत केली होती. डॉ. सुरेश भोसले हे कारखान्याच्या सत्तेत नशिबवान चेअरमन आहेत कारण त्यांना सहा-सहा वर्षे सत्ता भोगण्याचा मान मिळाला आहे.


गतवेळी ते चअरमन होते. लोकरी माव्याचे संकट आल्याने त्यांना एक वर्षाचा कालखंड वाढवून मिळाला होता. तर यावेळी कोरोना महामारीच्या संकटाने पुन्हा एकदा त्यांना एक वर्षे वाढवून मिळाले आहे. डॉ. सुरेश भोसले हे आपले पॅनल निश्चित करताना भाऊगर्दीतुन आणि कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून राजकिय नेत्यांचे संबध जपण्याचा प्रयत्न करत उमेदवारी निशिचत करणार हे जरी खरे असले तरी या पॅनलसाठी पाच तालुक्यातील  दिग्गज राजकीय नेत्यापैकी कोण कोण त्यांच्या पाठिशी उभी राहतील हे ही या निवडणुकीत महत्वाचे मानले जात आहे. वाळवा, शिराळा, कडेगांव-पलुस, कराड दक्षिण-कराड उत्तर या मतदार संघातील सर्वच आमदार हे महाविकास आघाडीतील असल्याने सहकार पॅनलच्या पुढेही अडचण होऊ शकते. यातुन डॉ. भोसले हे कसा मार्ग काढतात याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे.