नव्या नेतृत्वाचा उदय

नव्या नेतृत्वाचा उदय

नव्या नेतृत्वाचा उदय


कृष्णाकाठ सुजलाम सुफलाम होत होता. जयवंतराव अप्पांच्या कारकिर्दीत अनेकगावांमध्ये जल सिंचनाच्या योजना राबवून हजारो एकर जमिन ओलिताखाली आलीहोती. अनेक ठिकाणी माळावरती वाहत असलेले पाणी पाहून शेतकरी सभासदांचे चेहरे आनंदाने फुलले होते. त्यांना लागेल ती मदत शासनस्तरावरुन भाऊ करत होते. कारखाना प्रगतीचे ठप्पे ओलांडत होता. याला दृष्ट लागली आणि हे दोन भाऊ एकमेकांविरोधात 1989च्या कारखान्याच्या निवडणुकीत आमने सामने आले.प्रचाराच्या सभांतून एकमेकांवर आरोप केले जात होत. भाऊंचा लढा हा कष्टकरी शेतकरी कारखान्याचा सभासद झाला पाहिजे. कारखान्यांनी उभारलेल्या पुरक संस्था सभासदांच्या मालकिच्या झाल्या पाहिजे अशी भुमिका होती. तर अप्पा गेल्या तीस वर्षांमध्ये कारखाना  कशा पद्धतीने प्रगती पथावर गेला याचे मुद्दे मांडत होते. भाऊंच्या आरोपाला प्रतिउत्तर देत होते. सलग तीस वर्षे कारखान्याचे चेअरमनम्हणून त्यांनी जे काम केले ते कारखाना प्रगती पथावर नेण्यासाठी केले होते. यामुळेच कृष्णा कारखाना आशिया खंडात अग्रेसर म्हणून ओळखत होता.

कारखान्याच्या माध्यमातून जलसिंचन योजना उभारणारा हा कारखाना अनेक शेतकर्‍यांचे कुटुंबे उभे करण्यामध्ये संसार चालविण्यामध्ये
सहभागी होता. केवळ एक हाती सत्ता होती म्हणूनच ही प्रगती होऊ शकली. ज्या कारखान्यांमध्ये वारंवार बदल होतात त्या संस्था काही अंशी प्रगती पासून खुंटल्याही जातात. अप्पांनी कारखान्या बरोबर सर्वसामान्य शेतकर्‍यांची मुले शिक्षण घ्यावी म्हणून शिक्षण संस्था उभारल्या. कृष्णा चॅरिटेबल
ट्रस्ट काढून सभासद शेतकर्‍यांना व इतर लोकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. मयुर कुकुटपालन संस्था निर्माण केली. या संस्था चांगल्या चाललेल्या होत्या. 1989 निवडणुकीत याच प्रचाराचा मुद्दा बनल्या. सभाचे फड रंगू लागले. वार्षिक सभेत झालेला गोंधळ आणि वत्रे साहेंबांचा प्रसाद अनेक शेतकरी सभासदांना मिळाला होता. यातून चीडही निर्माण झाली होती. दोन्ही पॅनल एकमेकांसमोर उभी ठाकली आणि तब्बल तीस वर्षाची सत्ता उलथवून रयत पॅनल सत्तेवर आले. भाऊंच्या नेतृत्वाखाली हे पॅनल सत्तेवर आल्यानंतर भाऊंनी मदनराव मोहिते यांना कारखान्याचे चेअरमन केले. मदनराव मोहिते यांचा चेअरमन झाल्यानंतरच राजकिय क्षेत्रात उदय झाला पण भाऊंचा सहकारातील गाढा
अभ्यास आणि खुले सभासदत्व देण्याची केलेले घोषणा सत्तेवर येताना पाळली व नियोजन भवनात बसून भाऊ कारखान्याच्या नुतन चेअरमनसह संचालकांना वारंवार मागदर्शन करत होते.

कारखान्यामध्ये त्यांचे बारिक लक्ष होते. त्यांच्या अधिपत्याखाली मदनराव मोहितेंचे नेतृत्व फुलत होते. त्यांनाही सहकाराची माहिती होत होती. त्यांनी खुले सभासदत्व देऊन 13528 सभासद वाढवले. मदनदादा आक्रमक स्वभावाचे होते. त्यांनी पहिली पाच वर्षे कारखान्यात काम करताना चेअरमन केबिनचा दरवाजा कायम उघडा ठेवला. त्यामुळे त्यांना येणारा प्रत्येक शेतकरी, सभासद अथवा सर्वसामान्य माणूस थेट भेटत होता. त्यांची अडचण ऐकून तात्काळ कामकाज करत होते. यामुळे मदनदादा कृष्णा काठावर चांगलेच चर्चेत आले होते. सर्वसामान्य लोकांना भेटणार चेअरमन असा त्यांची ख्याती झाली. शेतकर्‍यांचा ऊस तुटला नसला तरी त्याला लग्न समारंभासाठी काही मदत लागली तर मदनदादा थेट करत होते. कारखान्याच्या प्रशासनावरही त्यांची मोठी पकड होती. येणार्‍या सभासदांची अडचण ऐकून घेतल्यानंतर एखादा शेतकरी माझ्या मुलीचे लग्न आहे. ऊस गेलेला नाही दादा काही मदत होईल का असे म्हणताच ते थेट शेतकी अधिकार्‍याला बोलावून घेत यांचा ऊस किती नोंदला आहे असे विचारत कारखान्याच्या अंकाऊंटटला बोलावलेले असायचे ऊसाचे क्षेत्र समजताच त्यांना अंकाऊंटटला चेक देण्यासाठी सांगायचे नंतर शेतकी अधिकार्‍यांला यांचा ऊस तोडून आणा म्हणून सांगायचे असा चेअरमन झालाच नाही. अशी प्रतिमा त्यांना निर्माण केली. जे पटत नव्हते ते ताडकन जमणार नाही म्हणून सांगायचे यामुळे मदनदादांचे नेतृत्व कृष्णाकाठी गाजू लागले. त्यांना मार्गदर्शन करण्याची भुमिका भाऊंची असल्याने एखादा निर्णय घ्यायचा झाला तर तो भाऊंना विचारल्याशिवाय घेत नव्हते. कृष्णाकाठी हे एक नेतृत्व नव्याने उदयास आले. आणि याच नेतृत्वाला 1994 च्या निवडणुकीत सामोर जावे लागले. पुन्हा एकदा 1994 ला रयत पॅनल आणि सहकार पॅनलमध्ये संघर्ष उभा ठाकला....


          क्रमशः