उदयदादांच्या समोर निर्णयाचा बाका प्रसंग

उदयदादांच्या समोर निर्णयाचा बाका प्रसंग
उदयदादांच्या समोर निर्णयाचा बाका प्रसंग

उदयदादांच्या समोर निर्णयाचा बाका प्रसंग


यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीचा प्रचार सुरू झाला असून. सहकार व रयत आणि संस्थापक ही तीन पॅनेल निवडणूक रिंगणात सध्यातरी सक्रीय झाली आहेत. सहकार पॅनेलचे नते डॉ. सुरेश भोसले आणि रयत पॅनेलचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते व संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते हे तिघेही प्रचारात मग्न आहेत. एकीकडे या प्रचाराच्या रणधुमाळ्या सुरू असताना आजपर्यंत कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीत निर्णायक भूमिका बजावणारे विलासकाका-उंडाळकर यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली उंडाळकर गट कोणला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून उदयदादांच्या समोर आगामी जिल्हा बँकेची निवडणूक त्याच बरोबर शेती उत्पन्न बाजारसमितीची निवडणूक होवू घातील असल्याने त्यांच्यासमोर निर्णय घेताना बाका प्रसंग निर्माण झाला आहे. दुरगामी परिणाम करणारा हा निर्णय ते कोणाच्या पारडयात टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीत स्व. विलासराव पाटील - उंडाळकर यांनी नेहमीच किंगमेकरची भूमिका पार पाडली आहे. आता त्यांच्या पश्चात अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी दोन्ही मोहिते समविचारी गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. दोन दिवसापूर्वी त्यांच्या समर्थकांची कोयना दूध संघावर महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत बहुतांशी कार्यकर्त्यांनी अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला ताकद देण्याचे मत व्यक्त करतानाच आगामी जिल्हा बँकेची निवडणूक आणि बाजारा समितीची निवडणूक डोळयासमोर ठेवून उदयदादांनी निर्णय घ्यावा तो आम्हाला मान्य असेल असा सुर आवळला होता. त्यामुळे आतापर्यंंत उंडाळकर गट कोणाच्या पाठीशी हे स्पष्ट झालेले नाही.
डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते गटाची चर्चा फिस्कटल्यानंतर मंगळवारी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत उंडाळकर गटाची बैठक झाली. या बैठकीस आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे काही खंदे समर्थकही उपस्थित होते. या बैठकीत बहुतांश पदाधिकार्‍यांनी संस्थापक पॅनेलच्या पाठिमागे ताकद उभी करावी, असे मत मांडले आहे. तीन तास झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर आगामी दोन दिवसात अ‍ॅड. उदयसिंह पाटील हे भूमिका जाहीर करणार असल्याचेही यावेळी निश्चित करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.


गेल्या दोन दिवसापासून अ‍ॅड. उदयसिंह पाटील कोणती भूमिका घेणार हा निर्णय त्यांचा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. कृष्णेच्या निवडणूकीत 2010 ला विलासकाकांनी अविनाश मोहितेंना सहकार्य केले आणि मोहिते-भोसले मनोमिलनाचे पॅनेल पराभूत केले. कृष्णेच्या निवडणूकीत आजपर्यंत जीकडे उंडाळकर गट तिकडे गुलाल असे समिकरण मानले जात होते. मात्र विलासकाकांच्या नंतर ही निवडणूक होत आहे. उदयसिंह पाटील यांनी विलासकाकांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांच्या बरोबर सातत्याने वेगवेगळया कार्यक्रमात, बैठकांमध्ये सहभागी असतात. कृष्णेच्या निवडणूकी संदर्भात दोन मोहित्यांच्या एकीकरणाच्या ज्या ज्या बैठका पार पडल्या त्यामध्ये उदयदादांचा सहभाग होता. मात्र मी या चर्चेतून बाहेर पडत असल्याचे पृथ्वीराजबाबांनी जाहीर केले आणि काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आले असतानाच उदयदादांनी आपल्या समर्थकांची बैठक घेणे. त्यांची मते जाणून घेणे ही परंपरा कायम ठेवत उंडाळकर गट म्हणून आपण काय भूमिका घ्यायची याबाबत कार्यकर्त्यांनाच मत मांडायला लावले. त्यातील बहुतांशीनी अविनाश मोहितेंना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. खरेतर याठिकाणी उदयदादांनी दोन मोहितेंच्या बैठकीत नेमके काय घडले हे स्पष्ट करायला पाहिजे होते म्हणजे कार्यकर्त्यांनीही आपली भूमिका योग्य मांडली असती. आणि निर्णय घेणे सोपे झाले असते.


उदयदादांच्यावर कार्यकर्त्यांनी निर्णय घेण्याचा सर्वाधिकार दिल्याने उदयदादांच्यासमोर बाका प्रसंग निर्माण झाला आहे. तो जो निर्णय घेतील त्याचे राजकारणात दुरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. कारण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आणि शेती उत्पन्न बाजार समितीत सत्ता कायम ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. का ते पृथ्वीबाबांसारखे मी ही या निवडणूकीतून बाहेर राहणार अशी भूमिका घेतात याकडे कृष्णाकाठचे लक्ष लागले आहे. दादांनी सावध प्रवित्रा घ्यावा अन्यथा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उभा राहण्याची शक्यता आहे.

उंडाळे / प्रतिनिधी