कृष्णा हॉस्पिटलला मिळाली प्लाझ्मा थेरपीसाठी मान्यता

कृष्णा हॉस्पिटलला मिळाली प्लाझ्मा थेरपीसाठी मान्यता
कराड : कृष्णा हॉस्पिटल

कराड/प्रतिनिधी : 
          पश्चिम महाराष्ट्रात कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता लाभलेले कृष्णा हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातील एकमेव रूग्णालय असून, या थेरपीचा लाभ कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे.
          कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाविरूद्धच्या लढाईत पूर्वीपासूनच आघाडी घेतली आहे. सर्वांत पहिल्या विशेष कोरोना वार्डची निर्मिती, सातारा जिल्ह्यातील पहिली कोरोना चाचणी लॅब, कोरोना लस संशोधनात सहभागी असणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था अशी कामगिरी करणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र अन्न व औषध प्रशासनाकडून हॉस्पिटलला नुकतेच प्राप्त झाले आहे. 

*सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम*