कृष्णा सहकारी बँकेचा गोव्यात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

कृष्णा सहकारी बँकेचा गोव्यात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

कराड/प्रतिनिधी : 
                        सहकारी बँकिंग क्षेत्रात मान्यताप्राप्त समजला जाणारा फ्रंटीअर्स इन को-ऑपरेटीव्ह बँकींग पुरस्कार रेठरे बुद्रुक ता. कराड येथील कृष्णा सहकारी बँकेला प्राप्त झाला आहे. गोव्यात नुकत्यात झालेल्या एका शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते बँकेच्या पदाधिकार्‍यांनी हा पुरस्कार स्विकारला.
                        सहकार क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या बँकांना फ्रंटीअर्स इन को-ऑपरेटीव्ह बँकींग पुरस्काराने गौरविले जाते. यंदाचा राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ठ पत वाढ आणि बेस्ट टर्नअराऊंड बँक असे दोन पुरस्कार कृष्णा सहकारी बँकेला प्राप्त झाले आहेत. गोव्यात झालेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, संचालक शिवाजीराव थोरात, हेमंत पाटील, प्रदीप थोरात, महोदव पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे यांनी स्विकारला.    
                       यावेळी बोलताना बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे म्हणाले, की बँकेचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले आणि चेअरमन ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने 525 कोटीपेक्षा जादा व्यवसाय केला असून, बँकेने आकर्षक व्याजदराच्या ठेवयोजना व किफायतशीर व्याजदराच्या कर्ज योजना ग्राहकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. बँकेची कामकाजातील पारदर्शकता व बँकेवरील सभासद व ठेवीदार यांचा विश्‍वास यामुळेच हे दोन पुरस्कार बँकेला प्राप्त झाले आहेत. यावेळी देशभरातील विविध 600 हून अधिक सहकारी बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते.