‘कृष्णा’चे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे यांच्यावर शस्त्रक्रिया

कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये नुकतीच हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याने त्यांना रूग्णालयातून नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

‘कृष्णा’चे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे यांच्यावर शस्त्रक्रिया
कराड : कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे यांना बायपास शस्त्रक्रियेनंतर डिस्चार्ज देताना कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉ. प्रवीण साळुंखे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजीत शेळके, डॉ. संजय पाटील व अन्य मान्यवर.

‘कृष्णा’चे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे यांच्यावर शस्त्रक्रिया

कराड/प्रतिनिधी : 
         कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये नुकतीच हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याने त्यांना रूग्णालयातून नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. 
         ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉ. प्रवीण साळुंखे, डॉ. सम्राट मदनाईक, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजीत शेळके, डॉ. विजयसिंह पाटील यांचे कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी अभिनंदन केले.
         कृष्णा हॉस्पिटलच्या हृदय व रक्तवाहिन्या शस्त्रक्रिया विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने व अत्याधुनिक उपचार प्रणालीचा वापर करत यापूर्वीही अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. विशेषत: कोविड-१९ च्या लॉकडाऊन काळात ८५ हून अधिक हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश शस्त्रक्रिया मोफत केल्याने त्याचा रूग्णांना मोठा लाभ झाला आहे.