महाबळेश्वर बाजारपेठेत रात्रीच्या वेळेस रानगवा

महाबळेश्वर बाजारपेठेत रात्रीच्या वेळेस रानगवा

वाई दौलतराव पिसाळ दि. 4 


पुणे कोल्हापुर सांगली या नंतर आता महाबळेश्वर शहराच्या मुख्य बाजार पेठेत रानगवा शिरल्याची घटना समोर आली आहे सोमवारी मध्यरात्री 1 वाजता एक वाट चुकलेला रानगवा बाजारपेठे आला बस स्थानका पासुन ते बाजारपेठेतुन छ शिवाजी महाराज चैकातुन खिंडीत आणि तेथुन तो जंगलात परतला सुदैवाने कोणतीही दुघर्टना येथे घडली नसली तरी नागरीक आणि पयर्टकांतुन घबराटीचे वातावरण पसरले आहे महाबळेश्वर हे प्रसिध्द थंड हवेचे पयर्टन स्थळ सदाहरीत घनदाट जंगलांनी वेढलेले आहे या जंगलात रानगव्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढलेली आहे हे गवे नेहमी कळपाने संचार करीत असतात येथील विविध पाॅइंर्टवर कायम रानगव्यांचे दशर्न नागरीक व पयर्टकांना होत असते रानगव्यांच्या हल्ल्याच्या घटनाही येथे घडलेल्या आहेत काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर अनेक जण रानगव्यांच्या हल्ल्यात जखमीही झालेले आहेत हे रानगवे अनेक वेळा शेतीत शिरून पिकांचे मोठे नुकसान देखिल करतात परंतु हे रानगवे शहरात कधी आले नाहीत परंतु सोमवारी कळप सोडुन एक रानगवा वाट चुकून शहरातील नागरी वस्तीत आला मधुसागर या भागात फिरणारा हा वयोवृध्द रानगवा शहरात घुसला बस स्थानक मागेर् हा गवा सुभाषचंद्र बोस चैकात आला तेथुन तो बाजारपेठेत शिरला या ठिकाणी काही युवक हे रानगव्याच्या मागे लागले युवक आरडा ओरडा करीत रानगव्याच्या मागे लागताच रानगवा हा पळत सुटला होता तो जेव्हा पोलिस ठाण्यासमोर आला तेव्हा पोलिसांनी रानगव्याच्या मागे लागलेल्या युवकांना हटकले तेव्हा ते युवक मागे फिरले तेथुन तो रानगवा हा हळु हळु चालत पुढे गेला हनुमान मंदीर मागेर् तो छ शिवाजी महाराज चैकात पोहचला याच दरम्यान वन विभागाचे दोन कमर्चारी हे तेथे आले या ठिकाणी काही युवकही होते युवकांच्या मदतीने वन कमर्चारी यांनी हा रानगवा शहराच्या इतर भागात किंवा नागरी वस्तीत जावु नये याची खबरदारी घेतली तेव्हा तो रानगवा हा खिंडीत शिरला त्या नंतर तो पुढे जंगलात आपल्या नैसगिर्क अधिवासात परतला रानगवा शहरात शिरल्याचे वृत्त सोशल मिडीयाच्या माध्यमातुन घराघरात पोहचले त्या मुळे शहरातील नागरीकांत व पयर्टकां मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे रानगवा हा तसा शांत प्राणी आहे पंरतु त्याला छेडले तर तो प्रतिहल्ला करतो अशा वेळी दुघर्टना घडु शकते रानगवा हा वाट चुकून शहरात आला तर त्याच्या मागे लागणे आराडा ओरडा करणे हे धोक्याचे ठरू शकते म्हणुन नागरीकांनी अशा गोष्टी टाळाव्यात असे आवाहन येथील वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकणीर् यांनी केले असुन नागरीक व पयर्टकांनी घाबरून जावु नये असेही श्रीकांत कुलकणीर् यांनी स्पष्ट केले