'महाबळेश्वर मध्ये दारू विक्री जोमात'

"सरकारी आदेश मात्र कोमात"

'महाबळेश्वर मध्ये दारू विक्री जोमात'
'महाबळेश्वर मध्ये दारू विक्री जोमात'

संजय चोरगे
महाबळेश्वर / प्रतिनिधी

महाबळेश्वरच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या स्ट्रेचर अँड कंपनी या सरकार मान्य मद्य विक्रीच्या दुकानातून आज दि.२२ रोजी  जिल्हाप्रशासनाचे सर्व आदेशांना कोलदंडा देऊन राजरोसपणे मद्य विक्री चालू होती.
   २२ तारखेपासून मद्य प्रेमींना घरपोच सेवा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असताना देखील सदर मद्यविक्री दुकानदाराने मात्र आपल्या दुकानाबाहेर मुख्य प्रवेशद्वारावर मद्य विक्रीचा प्रताप चालू केल्याने सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. दैनिक प्रीतिसंगम च्या स्थानिक प्रतिनिधीने सदर प्रकरणात हस्तक्षेप केला असता सदरचे दारू दुकान तातडीने बंद करण्यात आले. शहराच्या मुख्य ठिकाणी चालू असलेला हा गैरप्रकार स्थानिक प्रशासनाच्या लक्षात कसा आला नाही याचे मात्र आश्चर्यच व्यक्त करावे लागेल ?