महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांना प्रशिक्षणाचे नवीन दालन खुले संस्थापक अध्यक्ष:जिजाबा पवार.

महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांना प्रशिक्षणाचे नवीन दालन खुले संस्थापक अध्यक्ष:जिजाबा पवार.
महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांना प्रशिक्षणाचे नवीन दालन खुले संस्थापक अध्यक्ष:जिजाबा पवार.

महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांना प्रशिक्षणाचे नवीन दालन खुले....
संस्थापक अध्यक्ष:जिजाबा पवार.
...

दौलतराव पिसाळ / वाई प्रतिनिधी. 

सहकार क्षेत्रामध्ये प्रशिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे घटनेच्या 97 व्या दुरुस्ती पूर्वी दिलेल्या सर्व सहकारी संस्थांची प्रशिक्षण केंद्र रद्द करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 24 (अ) नुसार सहकारी संस्थांना प्रशिक्षण देण्याची मान्यता देण्यात आली. राज्यातील शिखर संस्थांना प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून अधिसूचित करण्यात आले यामध्ये एकूण राज्यांमध्ये 13 सहकार प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी संस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई या संस्थेला मान्यता देऊन अधिसूचित करण्यात आले आहे. 97 व्या घटना दुरुस्ती मुळे सहकारी संस्थां मध्ये व्यवसायिक दृष्टीकोण विकसित होत आहे. हा धागा पकडून राज्यातील बहुसंख्य नागरिक कोणत्या ना कोणत्या सहकारी संस्थांशी जोडलेला आहे.

या सहकारी संस्थांची माहिती प्रत्येक सभासदांना अवगत असणे सभासदांच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 2020 अखेर सुमारे 2.12 लाख विविध सहकारी संस्था कार्यरत आहेत यामध्ये एकूण 5.50 कोटी एवढी सभासद संख्या आहे. या संस्थांच्या संचालकांची संख्या सुमारे 2.5 लाखापेक्षा जास्त असून कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 3.50 लाख आहे. व दैनंदिन ठेव प्रतिनिधींची संख्या सुमारे 2.50 लाख आहे. सर्व सभासद संचालक कर्मचारी अधिकारी व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांना शासन मान्य सहकार प्रशिक्षण व शिक्षण देणे अनिवार्य आहे. राज्या मध्ये असणाऱ्या शासन मान्य प्रशिक्षण केंद्रांची संख्या 13 ही अत्यंत अल्प स्वरूपाची आहे. म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन ली. मुबंई यांना 24. मे. 2021 रोजी शासन निर्णयामध्ये प्रशिक्षण व शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संस्थेचा उपयोग राज्यातील सर्व सहकारी संस्थांना देण्यात येईल...


                          संस्थेची प्रशिक्षण केंद्रे मुंबई पुणे आणि वाई या ठिकाणी अत्याधुनिक डिजिटल तंत्राचा वापर करून लवकरच सुरू करणार आहेत. प्रशिक्षण केंद्रांच्या मान्यतेसाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री:नामदार बाळासाहेब पाटील, राज्य सहकार मंत्री: नामदार विश्वजीत कदम, सहकार सचिव: अरविंद कुमार, सहकार आयुक्त: अनिल कवडे, अपर निबंधक सहकारी संस्था डॉक्टर: खंडागळे, संतोष पाटील, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सह अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष: जिजाबा पवार यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली....