महास्वच्छता अभियानांतर्गत कृष्णाकाठाची स्वच्छता

महास्वच्छता अभियानांतर्गत कृष्णाकाठाची स्वच्छता


 
कराड / Rajendra Mohite  :
             कराड शहराला कृष्णा, कोयना गाड्यांना आलेल्या महापुराचा फटका बसला होता. या पुरामुळे वाहून आलेला कचरा साचून कृष्णाघाटास कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच पूर ओसरल्या नंतर सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे आठ दिवसांपासून कºहाड शहर स्वच्छतेत झटलेले हजारो हात ‘चला, कृष्णा नदी वाचवूया,’ असा संदेश देत कृष्णाकाठी एकत्रित आले. पालिकेच्यावतीने आयोजित महास्वच्छता अभियानातून कृष्णाकाठ निर्मल केला.
             या महास्वच्छता अभियानात नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नोडल ऑफिसर आर. डी. भालदार, अभियंता ए. आर. पवार,  नगरसेवक विजय वाटेगावकर, विनायक पावसकर, विद्या पावसकर, सदाशिव यादव, स्मिता हुलवान, सौरभ पाटील, सुहास जगताप, प्रितम यादव, एन्व्हारो नेचर फे्रन्डस क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पालिकेच्या अधिकारी, कर्मचाºयांनी सहभागी होत नदीकाठची स्वच्छता केली.
             येथील कृष्णा-कोयच्या संगममावर मंगळवारी कराड पालिकेच्यावतीने कृष्णा नदीत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सुमारे दोन हजार शालेय विद्यार्थी, पंधराहून अधिक सामाजिक संस्था, हजारहून अधिक कराडकर नागरीक, लोकप्रतिनिधींनी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. यांच्याकडून घाटावर सुमारे तीन तास स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी महापूरातील पाण्यातून वाहून आलेल्या गोधडी, झाडेझुडपे, कपडे, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या एकत्रित करून पालिकेच्या कचरा गाडीद्वारे बाहेर काढण्यात आला.  या स्वच्छता मोहिमेनंतर कृष्णानदीकाठाने मोकळा श्वास घेतला.