माळेगाव बुद्रुक नगरपंचायत की पुन्हा ग्रामपंचायत ?

राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवडणूक कार्यक्रमांमध्ये माळेगाव बुद्रुक नगरपंचायत चे नाव वगळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेस उधान

माळेगाव बुद्रुक नगरपंचायत की पुन्हा ग्रामपंचायत ?

माळेगाव बुद्रुक नगरपंचायत की पुन्हा ग्रामपंचायत ?

 

बारामती प्रतिनिधी / भारत तुपे


              राज्यातील 105 नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच प्रसिद्ध केला या प्रसिद्ध केलेल्या जीआर मध्ये परिशिष्ट 2 मध्ये पुणे जिल्ह्यातील नवनिर्मित नगर पंचायती मध्ये माळेगाव नगरपंचायत चे नाव वगळल्याने व अशा प्रकारचा जीआर व्हाट्सअप वर वायरल झाल्याने माळेगाव मधील स्थानिक नागरिकांमध्ये माळेगाव नगरपंचायत राहणार की ग्रामपंचायतच राहणार या चर्चेला मोठ्या प्रमाणामध्ये उधान आल्याचे दिसून येत आहे.
                 तसेच यामध्ये स्थानिक नागरिकांमधून माळेगाव नगरपंचायत रद्द होऊन बारामती जिल्हा होण्याच्या मार्गाकडे असल्या कारणाने माळेगाव हे बारामती ला जोडून माळेगांव - बारामती नगरपालिका तर करणार नाहीत ना असा प्रश्न ही स्थानिक नागरिकांमधून मधुन उसळू लागला आहे तसेच दुसऱ्या बाजूने माळेगाव नगरपंचायत ही नगरपंचायत साठी असणारे निकष पूर्ण करत नाही म्हणून माळेगाव नगरपंचायत रद्द झाली असल्याचे ही बोलले जात आहे. तर काही ठिकाणी माळेगाव नगरपंचायत चा सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे ही बोलले जात आहे यामुळे माळेगाव मध्ये वेगवेगळ्या प्रकारे या राज्य निवडणूक आयोगाच्या जीआर मुळे चर्चेस उधाण आल्याचे पाहावयास मिळत आहे.
               राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी 113 नगरपंचायती साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता परंतु दिनांक 24 /11/ 2021 च्या सुधारित राज्य निवडणूक आयोगाच्या जीआर नुसार परिशिष्ट क्रमांक 2 मध्ये 105 नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे यामध्ये एकूण 8 नगरपंचायती चा कार्यक्रम रद्द केलेला आहे या नगरपंचायती जिल्हानिहाय पुढील प्रमाणे /-पुणे-माळेगाव बुद्रुक नगरपंचायत,नाशिक- दिंडोरी नगरपंचायत, नांदेड-हिमायत नगर नगरपंचायत, अमरावती-धारणी नगरपंचायत,व नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत, वाशिम-मालेगाव नगरपंचायत, नागपुर-भिवापुर नगरपंचायत, गोंदिया-गोरेगाव नगरपंचायत,