माळेगाव नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रगीत गायन

बारामती / प्रतिनिधी

                 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी स. ११.०० वा समूह राष्ट्रगीत गायन करणे संदर्भात महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजीचे आदेशान्वये आज दि 17 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे चे आयोजन माळेगांव नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते यासाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी समस्त ग्रामस्थांना कळविले होते त्या अनुषंगाने माळेगांव  नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी माळेगाव नगरपंचायत समोरील प्रांगणामध्ये सामूहिक राष्ट्रगीत गायन केले

            या राष्ट्रगीत गायनासाठी माळेगाव चे माजी सरपंच दीपक तावरे, कायदेतज्ञ राहुल तावरे, श्रीमंत शंभू सिंह महाराज हायस्कूलचे पैठणकर सर तसेच विद्यार्थी, माळेगाव नगरपंचायत चे पदाधिकारी/कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

             दरम्यान माळेगाव येथील पोलीस स्टेशन येथे ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी स. ११.०० वा समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले यावेळी माळेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किरण अवचर तसेच पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड, पोलीस पाटील, व माळेगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिक उपस्थित होते