मलकापूरच्या मुख्याधिकाऱ्यांची आरक्षणाचा पुन:र्विचार करण्याची ग्वाही

आगाशिवनगर (मलकापूर) येथील पवार कुटुंबाच्या संपूर्ण शेतजमिनीवर मलकापूर नगरपालिकेने आरक्षण टाकले आहे. याप्रकरणी पालिकेच्या विरोधात अन्यायग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी उपोषण केले. दरम्यान, मलकापूरचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्याशी आंदोलकांची सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत मुख्याधिकाऱ्यांनी सदर ठिकाणच्या आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची ग्वाही अन्यायग्रस्त कुटुंबियांना दिली.

मलकापूरच्या मुख्याधिकाऱ्यांची आरक्षणाचा पुन:र्विचार करण्याची ग्वाही
मलकापूर : डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडताना पवार कुटुंबातील सदस्य
मलकापूरच्या मुख्याधिकाऱ्यांची आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची ग्वाही

शेतजमिन आरक्षण प्रकरण : उपोषणस्थळी डॉ. अतुल भोसले यांची भेट, त्यांच्या हस्ते सरबत घेऊन आंदोलक पवार कुटुंबीयांनी सोडले उपोषण

कराड/प्रतिनिधी :

     आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथील पवार कुटुंबाच्या संपूर्ण शेतजमिनीवर मलकापूर नगरपालिकेने आरक्षण टाकून त्यांच्यावर अन्याय केला आहे. याप्रकरणी पालिकेच्या विरोधात अन्यायग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी उपोषण सुरु केले. त्यानंतर डॉ. अतुल भोसले यांनी उपोषणस्थळी जाऊन पवार कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान, आंदोलकांची मलकापूरचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत मुख्याधिकाऱ्यांनी सदर ठिकाणच्या आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची ग्वाही दिली. त्यांनतर डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते आंदोलकांनी सरबत घेऊन उपोषण सोडले.

           याप्रसंगी बोलताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, मलकापूर नगरपालिकेने लादलेल्या अन्यायी आरक्षणामुळे पवार कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. हे आरक्षण उठवावे, यासाठी गेले अनेक वर्षे पवार कुटुंबीय लढा देत आहेत. अखेर त्यांच्या जमिनीवरील आरक्षण पालिकेने उठवावे, यासाठी पवार कुटुंबियांनी नगरपालिकेच्या दारात उपोषण केले. दरम्यान, याप्रश्नी आंदोलकांची मुख्याधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांबाबत सहानभूती दर्शवून, त्यांच्या जागेवर टाकलेल्या आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलकांनी माझ्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडल्याचे त्यांनी सांगितले.

      दरम्यान, आगाशिवनगर (मलकापूर) येथील एकाच शेतकरी कुटुंबाच्या संपूर्ण शेतजमिनीवर मलकापूर नगरपालिकेने 200९ पासून त्यांच्या 21 एकर 15 गुंठे शेतीवर स्पोर्टस कॉम्प्लेक्स व गार्डन, लायब्ररी व अग्रो झोन, ग्रीन झोन, रस्ता व ग्रीन झोन, हायस्कूल व प्ले ग्राउंड अशा पद्धतीचे आरक्षण टाकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी जाणून-बुजून सदर शेतजमिनीवर आरक्षण टाकल्याचा आरोप करत पालिकेने 31 जानेवारीपूर्वी सदर आरक्षण न हटवल्यास अन्यायग्रस्त पवार कुटुंबातील सर्व सदस्यांनी पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार हे उपोषण करण्यात आले होते.

      परंतु, डॉ. अतुल भोसले यांनी उपोषणस्थळी जाऊन अन्यायग्रस्त आंदोलक कुटुंबियांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी सदर आरक्षण प्रश्नी चर्चाही केली. दरम्यान,आंदोलकांची मलकापूरचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकरयांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत मुख्याधिकाऱ्यांनी सदर ठिकाणच्या आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची ग्वाही आंदोलक कुटुंबियांना दिली. त्यांनतर डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते आंदोलकांनी सरबत घेऊन उपोषण सोडले.