मलकापुरात माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु

राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर सुरु केलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीमेचा मलकापूरात दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील मोहिमेच्या पहिल्या टप्यात एकूण 7 हजार 883 कुटुंबांची सर्व्हेक्षणाद्वारे आरोग्य तपासणी  करण्यात आली. यामध्ये आढळलेल्या रुग्णांची तपासणी करुन उपचारासाठी विविध उपचार केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेले रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आता शासन निर्देशानुसार शहरात मोहिमेचा दुसरा टप्पा 14  ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आल्याची माहिती मलकापूरच्या मुख्याधिकारी श्रीमती आव्हाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मलकापुरात माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु
मलकापूर : सर्व्हेक्षणाद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करताना आरोग्य सेविका

मलकापुरात माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु 

पहिल्या टप्यात 7 हजार 883 कुटुंबांची तपासणी : उपचारार्थ रुग्ण कोरोनामुक्त, बुधवारपासून शहरात दुसऱ्या टप्यास प्रारंभ

कराड/प्रतिनिधी :
          राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर सुरु केलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीमेचा मलकापूरात दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील मोहिमेच्या पहिल्या टप्यात एकूण 7 हजार 883 कुटुंबांची सर्व्हेक्षणाद्वारे आरोग्य तपासणी  करण्यात आली. यामध्ये आढळलेल्या रुग्णांची तपासणी करुन उपचारासाठी विविध उपचार केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेले रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आता शासन निर्देशानुसार शहरात मोहिमेचा दुसरा टप्पा 14  ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आल्याची माहिती मलकापूरच्या मुख्याधिकारी श्रीमती आव्हाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
          शहरात माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत मलकापूर नगरपरिषदेने प्रभाग निहाय आशा सेविकांची नियुक्ती करून सर्व्हेक्षणाचे काम सुरु केलेले आहे. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यानच्या काळात शहरात सदर मोहिमेचा पहिला टप्पा राबविण्यात आला. यामध्ये 7  हजार883 कुटुंबांची आरोग्य तपासणी  करून उपचारासाठी पाठवलेले संशयित रुग्णही कोरोना मुक्त झाले आहेत. आता शहरात मोहिमेचा दुसरा टप्पा बुधवारपासून सुरु करण्यात आला आहे.
          या मोहिमेतील आरोग्य सर्व्हेक्षणा दरम्यान को-मॉर्बीड (उच्च रक्तदाब, शुगर,  कॅन्सर, ह्रदय विकार) रुग्णांच्यावर विशेष भर देण्यात आला. त्यामध्ये आढळून येणाऱ्या संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करण्यात आली. यासाठी काले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने भारती विद्यापीठ, मलकापूर व आगाशिवनगर येथे नगरपरिषदेच्या जिल्हा परिषद कॉलनीमधील बहुउद्देशिय इमारतीत सुरु असलेल्या फिवर क्लिनिकमध्ये रॅपिड ऍ़न्टीजेंट टेस्ट तपासणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
         तसेच शहरामधील फिरते विक्रेते,  भाजी, दुध व किराणा माल विक्रेते आदी. क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचीही तपासणी करण्याचे नियोजन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. तसेच शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांमध्येही लक्षणे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीला वरील दोन्ही ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्याच्या सुचना नोडल अधिकाऱ्यांनी संबंधित डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत.
         त्याचबरोबर शहरातील नागरिकांनी या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन मलकापूर शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. तसेच एखाद्या कुटूंबातील व्यक्तीस सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा अशी लक्षणे आढळून आलेस त्यांनी तातडीने फिवर क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहनही मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.