'मन गुतल' अल्बम सॉंग सोमवारी होणार रिलीज

ग्रामीण भागातील युवक कलाकारांनी एकत्र येत 'मन गुतल' या अल्बम सॉंगची निर्मिती केली आहे. हे सॉंग उद्या सोमवारी 21 रोजी कराड येथून 'चेतन गरुड प्रॉडक्शन' या युट्युब चॅनेलवर रिलीज करण्यात येणार आहे.

'मन गुतल' अल्बम सॉंग सोमवारी होणार रिलीज
'मन गुतल' या अल्बम सॉंगच्या रिलीजची माहिती देताना लेखक, दिग्दर्शक अभिषेक सकटे. सोबत, अल्बमची संपूर्ण टीम.

'मन गुतल' अल्बम सॉंग सोमवारी होणार रिलीज 

लेखक, दिग्दर्शक अभिषेक सकटे यांची माहिती : ग्रामीण भागातील युवकांची कलाकृती

कराड/प्रतिनिधी :

           ग्रामीण भागातील युवक कलाकारांनी एकत्र येत 'मन गुतल' या अल्बम सॉंगची निर्मिती केली आहे. हे सॉंग उद्या सोमवारी 21 रोजी कराड येथून 'चेतन गरुड प्रॉडक्शन' या युट्युब चॅनेलवर रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती लेखक, दिग्दर्शक अभिषेक सकटे यांनी दिली. 

         येथील हॉटेल अलंकार येथे रविवारी 20 रोजी 'मन गुतल' या अल्बम सॉंगच्या रिलीज कार्यक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गायिका व अभिनेत्री साक्षी कालवडेकर, अभिनेता रोहन यादव यांच्यासह मन गुतल'ची संपूर्ण टीम उपस्थित होती.

        सकटे म्हणाले, आम्हा सर्व कलाकारांना कोणताही कलेचा वारसा नाही. परंतु, धेय्याने, जिद्दीने झपाटलेल्या आम्ही सर्व ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील कलाकारांनी प्रत्येकाची कला पारखून ही टीम तयार केली आहे. हे अल्बम सॉंग तयार करण्यासाठी आम्हाला कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी आल्या. मात्र, सर्व कलाकारांच्या घरच्यांनी सपोर्ट केल्यामुळे आम्ही तब्बल 6 महिन्यांनंतर या सॉंगचे रेकॉर्डिंग पूर्ण करून उद्या ते रिलीज करत आहोत. याचा आम्हाला आनंद आहे. ‘शहरी व ग्रामीण भागातील युवकांची प्रेमकहाणी’ ही या सॉंगची थीम असून ती नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच सोमवारी 21 रोजी 'चेतन गरुड प्रोडक्शन' या यूट्यूब चॅनलवर जाऊन सर्वांनी हे सॉंग आवश्यक पहावे. त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक व सबस्क्राईबही करावे, असे आवाहनही लेखक, दिग्दर्शक सकटे यावेळी केले. 

संगीत व अभिनयाची सुरुवातीपासून आवड होती. ही कला जोपासण्यासाठी व त्याचे व्यवसायात रुपांतर करण्यासाठी सर्व कुटुंबियांनी पाठबळ दिले. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींवर अनेक बंधने असतात. मात्र, ते झुगारण्याचे आव्हान पेलण्यासाठी कुटुंबीयांनीच बळ दिल्याने आज तिथपर्यंत पोहोचता आले. भविष्यात संगीत विशारदचे क्लासेस घेणार असून ग्रामीण कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- साक्षी कालवडेकर (गायिका, अभिनेत्री)

आपली कला जोपासत ती चित्र वाहिनी आणि चित्रपट स्तरापर्यंत नेण्याची सुरुवातीपासून जिद्द बाळगली. आज त्याला यश आले असून 'मन गुतल' हे त्या दर्जाचे अल्बम सॉंग तयार केले आहे. ते नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळवेल, यात शंका नाही. तसेच यापुढेही दर्जेदार कलाकृती बनवून गरुडझेप घेण्याचे आमचे धेय्य आहे.

- रोहन यादव (अभिनेता)