माणिकराव पाटील यांचेकडून फूड पॅकेट व आरोग्य कीटचे वाटप; पोलिस व आरोग्य कर्मचार्‍यांत समाधान

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर परिसरातील जनतेसाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे व पत्रकार सहकार्‍यांचा सह्याद्रीचे संचालक माणिकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना फूड पॅकेट व आरोग्य कीटचे वाटप करण्यात आले.

माणिकराव पाटील यांचेकडून फूड पॅकेट व आरोग्य कीटचे वाटप;  पोलिस व आरोग्य कर्मचार्‍यांत समाधान

उंब्रज/प्रतिनिधी

 

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर परिसरातील जनतेसाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे व पत्रकार सहकार्‍यांचा सह्याद्रीचे संचालक माणिकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना फूड पॅकेट व आरोग्य कीटचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी तळबीड पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, घोणशी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उदयकुमार पाटील, भागवत पाटील, दिग्विजय पाटील, हवालदार अमर नारनवर, शशिकांत खाडे यांच्यासह पोलिस कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलिस पाटील, ग्रामसेवक व होमगार्ड उपस्थित होते. यावेळी माणिकराव पाटील यांनी जयश्री पाटील व डाॅ. संजय कुंभार यांच्या परिसरात सुरु असणाऱ्या सेवेची माहिती सांगून त्यांचे कौतुक केले. तसेच ग्रामस्थांनी आतापर्यंत ज्यापध्दतीने पोलिस व आरोग्य विभागाला सहकार्य केले आहे तसेच यापुढेही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी जयश्री पाटील, डाॅ. संजय कुंभार यांनीही उपस्थितांना प्रशासनाने घालून दिलेले नियम व सूचना याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी तळबीड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पत्रकारांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस, पत्रकार व आरोग्य विभाग कर्मचार्‍यांनी माणिकराव पाटील यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले. 

-----------