मायक्रो फायनान्स कंपन्यांना बळीराजाचा दणका

बळीराजा शेतकरी संघटनेने सक्तीच्या कर्जवसुलीबाबत आक्रमक भूमीका घेत होती. याप्रकरणी संघटनेच्या मागणीनुसार प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांचे वसुली अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये संपूर्ण अनलॉक उठेपर्यंत कर्जवसुली न करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी फायनान्स कंपन्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे सामान्य कर्जदारांना दिलासा मिळाला असून मायक्रो फायनान्स कंपन्यांना बळीराजाच्या आक्रमक भूमीकेचा चांगलाच दणका बसला आहे. 

मायक्रो फायनान्स कंपन्यांना बळीराजाचा दणका
कराड : बैठकीस उपस्थित बळीराजा व संबंधित फायनान्स कंपन्यांचे पदाधिकारी

मायक्रो फायनान्स कंपन्यांना बळीराजाचा दणका 

सक्तीची कर्जवसुली थांबणार : प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना, संपूर्ण अनलॉक उठेपर्यंत कर्जवसुली न करण्याची फायनान्स कंपन्यांची कबुली 

कराड/प्रतिनिधी :
          बळीराजा शेतकरी संघटनेने सक्तीच्या कर्जवसुलीबाबत आक्रमक भूमीका घेत होती. याप्रकरणी संघटनेच्या मागणीनुसार प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांचे वसुली अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये संपूर्ण अनलॉक उठेपर्यंत कर्जवसुली न करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी फायनान्स कंपन्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे सामान्य कर्जदारांना दिलासा मिळाला असून मायक्रो फायनान्स कंपन्यांना बळीराजाच्या आक्रमक भूमीकेचा चांगलाच दणका बसला आहे. 
          येथील प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारी 12 रोजी ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामीण कुट्टा, बजाज फायनान्स, रत्नकर फायनान्स व उज्वल फायनान्स आदी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसह बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उपाध्यक्ष सुनील कोळी, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, इम्रान मुल्ला, सागर कांबळे आदींची उपस्थिती होती.
          सदर बैठकीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सर्व वसुली अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच इथून पुढच्या काळातही जोपर्यंत सर्व अनलॉक उठत नाही, तोपर्यंत कोणतीही सक्तीची कर्जवसुली करू देणार नसल्याची भूमिका मांडली. याप्रसंगी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी सध्या कोरोना सारख्या संकटसमयी कोणत्याही वसुली अधिकाऱ्याने सक्तीची कर्जवसुली करू नये. तसेच कर्जदारास यासंदर्भात मानसिक त्रासही देऊ नये, अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्यानंतरच मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आपली वसुली करावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. त्यानुसार संबंधित मायक्र फायनान्स कंपन्यांच्या वसुली कर्मचारी, अधिकाऱ्यांनीही संपूर्ण अनलॉक उठेपर्यंत कोणत्याही प्रकारे वसुलीसाठी कर्जदारांकडे तगडा लावला जाणार नसल्याची कबुली दिली.
         दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तसेच लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्या कर्जवसुली करत असल्याचे काही कर्जदार महिलांनी बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्या निदर्शनास आणून दिले. कोरोना काळात कर्जवसुली न करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश असतानाही ते डावलून फायनान्स कंपन्यांकडून सुरु असलेल्या कर्ज वसुलीबाबत बळीराजाने आक्रमक पवित्रा घेत यापुढेही ही कर्जवसुली अशीच चालू राहिल्यास संबंधित वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढू. तसेच वसुली न थांबल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही बळीराजा शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे दिला होता. तसेच यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी प्रांत कार्यालयात बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती.
         त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी बळीराजाच्या निवेदनाची दखल घेत सदर बैठक औयोजित केली होती. या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी संपूर्ण अनलॉक उठेपर्यंत कर्जवसुली न करण्याच्या सूचना फायनान्स कंपन्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या आक्रमक भूमीकेचा चांगलाच दणका बसल्याचे दिसून आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ग्रामीण भागातील कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे संबंधित कर्जदारांकडून बळीराजा संघटनेसह जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांचे आभार व्यक्त करण्यात आले.  

 

मायक्रो फायनान्स कंपन्यांचे अधिकारी व बळीराजाच्या पदाधिकाऱ्यांची प्रांत कार्यालयात बैठकीत संपन्न झाली. त्यामध्ये  प्रांताधिकार्‍यांनी संपूर्ण अनलॉक होईपर्यंत संबंधितांना कर्जवसुली न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कर्जदार, महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
           - साजिद मुल्ला (जिल्हाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना)