मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटले आहे : पृथ्वीराज चव्हाण

सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खुपच वाईट आहे. परंतु, मोदी सरकार ती फुगवून दाखवत असून मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे. त्यामुळे या वाढलेल्या महागाईवर मात करायची असल्यास भाजपचा पराभव करा.

मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटले आहे : पृथ्वीराज चव्हाण

मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटले आहे - पृथ्वीराज चव्हाणमहागाईवर मात करण्यासाठी भाजपचा पराभव करा, गोव्यातील जनतेला आवाहन 

पणजी/वृत्तसंस्था : 

      सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खुपच वाईट आहे. परंतु, मोदी सरकार ती फुगवून दाखवत असून मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे. त्यामुळे या वाढलेल्या महागाईवर मात करायची असल्यास भाजपचा पराभव करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

     काँग्रेस पक्षाने जेष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेसने उत्तरप्रदेश, उत्तराखंड व गोवा या तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार पणजी (गोवा) येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा, महिला अध्यक्ष बीना नाईक, सुनिल कवठणकर आणि नौशाद चौधरी आदी. उपस्थित होते. 
     पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपने देश आणि राज्याच्या जनतेची लूट सुरू केली आहे. नोटबंदी, वस्तू आणि सेवाकर (GST) लागू करणे हे मोदी सरकारची मोठी चूक होती. सध्या अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून ही स्थिती खुपच गंभीर आहे. या वर्षाच्या अंदाजपत्रकात मोदी कसे आकडे दाखवतात त्याच्यावर देशातील लोकांची नजर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
     ते म्हणाले, गोव्यामध्ये मागील वेळी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. तरीही जनतेचा जो कौल आहे, त्याचा भाजपने अनादर केला; हे सर्वज्ञात आहे. परंतु, यावेळी मागील चुकीची पुनरवृत्ती न होता काँग्रेसला बहुमत मिळणार असून  आम्ही स्थिर सरकार देणार असल्याची मला पुर्ण खात्री आहे. तसेच गोव्यातील जनता यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी देणार नाही, असेही श्री. चव्हाण यावेळी सांगितले.