मृत साळींदर खाण्याची इच्छा पडली महागात

कार्वे नाका ता. कराड येथे एका फ्लॅटवर मृत साळींदर पोत्यात लपवून ठेवल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. त्याआधारे रविवारी 30 रोजी पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सदर ठिकाणी छापा टाकून मृतावस्थेतील साळींदर वन्यप्राणी व एक स्विप्ट डिझायर गाडी ताब्यात घेतली.  तसेच एकावर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

मृत साळींदर खाण्याची इच्छा पडली महागात
साळींदर वन्यप्राणी संग्रहित फोटो

कराड/प्रतिनिधी :
         कार्वे नाका ता. कराड येथे एका फ्लॅटवर मृत साळींदर पोत्यात लपवून ठेवल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. त्याआधारे रविवारी 30 रोजी पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सदर ठिकाणी छापा टाकून मृतावस्थेतील साळींदर वन्यप्राणी व एक स्विप्ट डिझायर गाडी ताब्यात घेतली.  तसेच एकावर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
         याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मसूर-हेळगाव रोडवर कचरेवाडी नजीक एका अज्ञात वाहनाने साळींदर वन्यप्राण्यास धडक दिली. यामध्ये मृत पावलेल्या साळींदर वन्यप्राण्यास शशिकांत पवार याने खाण्याच्या उद्देशाने त्याच्या खाजगी गाडीतून (एम. एच. 14 सीएक्स 6671) कार्वे नाका येथील घरी आणले. 
         यासंदर्भातील माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली.  त्यानुसार रविवारी पहाटेच्या सुमारास पवार याच्या राहत्या घरी वनविभागाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात पवार याच्या बाथरूमध्ये पोत्यात ठेवलेले  मृतावस्थेतील साळींदर आढळून आले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने मृत साळींदर वन्यप्राणी व स्विफ्ट डिझायर गाडी ताब्यात घेतली असून पवार याच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियम  1972 नुसार गुन्हा नोंद केला आहे.
         सदरची कारवाई वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल ए. पी. सव्वाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, प्रशांत मोहिते, भारत खटावकर, सुनिता जाधव, कराड शहर पोलीस स्टेशन बीट मार्शल, होमगार्ड व पंच रोहन भाटे, भाऊसो नलवडे यांनी केली.