इस्लामपुरात मुक्तांगण तर्फे सहा हजार बियांचे रोपण 

 येथील मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे वन महोत्सवाच्या निमित्ताने शहराच्या जवळ असणाऱ्या दत्त टेकडीवर सहा हजार बियांचे रोपण करण्यात आले.  सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेला पालकांनी भेट देत विविध प्रकारच्या झाडांची माहिती घेतली. राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वृक्षारोपण करत उपक्रमात सहभागी झाले

इस्लामपुरात मुक्तांगण तर्फे सहा हजार बियांचे रोपण 
इस्लामपूर ; येथील मुक्तांगण प्ले स्कूलच्या बिया रोपण उपक्रमाची सुरवात करताना राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत.

 

प्रत्येक शाळेने सीड बँक स्थापन करावी ; 
                 कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत


इस्लामपूर / प्रतिनिधी

             येथील मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे वन महोत्सवाच्या निमित्ताने शहराच्या जवळ असणाऱ्या दत्त टेकडीवर सहा हजार बियांचे रोपण करण्यात आले.  सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेला पालकांनी भेट देत विविध प्रकारच्या झाडांची माहिती घेतली. राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वृक्षारोपण करत उपक्रमात सहभागी झाले
           येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात असणाऱ्या मुक्तांगण मध्ये चार वर्षांच्या आतील मुलांना  खेळातून शिक्षण दिले जाते. मुलांच्या निरीक्षणशक्तीला चालना देण्यासाठी विविध अनुभव दिले जातात. राज्य सरकारच्या वतीने सर्वत्र वन महोत्सव साजरा होत आहे. ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी पर्यत सुरू आहेत. याचे औचित्य साधून बिया रोपणाचा उपक्रम घेण्यात आला. 
          झाडे लावा, झाडे जगवा. एक मूल एक झाड आदी वृक्षसंवर्धनाच्या बाबत संदेश लिहलेले फलक मुलांच्या हातात होते. राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वनरक्षक व अधिकाऱ्यांनी रोपवाटिकेमध्ये असणाऱ्या विविध झाडांची माहिती दिली.  
           आपल्या आजूबाजूला अनेक फळझाडे, फुलझाडांच्या बिया पडलेल्या असताना प्रत्येकाने त्या बिया गोळा करून ठेवल्या पाहिजेत. यासाठी मुक्तांगण मध्ये प्रयत्न केले जातात. पावसाळ्यात योग्यवेळी योग्य ठिकाणी त्यांचे रोपण केल्यास मोठ्या प्रमाणात वनराई वाढेल.या भूमिकेतून उपक्रम राबविण्यात आला. गतवर्षी पाच हजार सीड बॉल निसर्गाच्या सानिध्यात टाकण्यात आले होते.
         करंजी,गुळभेंडी, लिंबोळी, जांभूळ, सीताफळ, रामफळ, चिंच, फणस, रान बाभूळ, सह विविध झाडांच्या बिया जमा करून पालकांनी मुलांच्या मदतीने दत्त टेकडीच्या डोंगरावर बिया फेकण्यात आल्या, पावसाळ्यात टेकडीवरील मोकळ्या जागेत, जमिनीमध्ये बिया टाकल्या.पावसाळ्यात याची उगवण चांगली होईल. बिया गोळा करून त्यांचे रोपण करण्याचा हा उपक्रम संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरणार असल्याचे असे मत मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. संचालिका वर्षाराणी मोहिते व अध्यक्षा  सरोजिनी मोहिते यांनी संयोजन केले.