मुंबईची तुंबई कोणामुळे होते ?.

मुंबई बंदराचा विकास,कापड बनविणाऱ्या गिरण्या इतर शहराशी जोडण्यासाठी रेल्वेचा विकास व विस्तार ब्रिटिशांनी केला.म्हणूनच मुंबईची तुंबई कधी झाली नाही.मग आताच मुंबईची तुंबई कोणामुळे होते ?.

मुंबईची तुंबई कोणामुळे होते ?.

 


        मुंबई म्हणजे जगाची जागतिक बाजारपेठ,भारताची औद्योगिक जगताची राजधानी. मुंबई म्हणजे एक राज्य आहे. एका राज्याच्या वार्षिक बजेटा पेक्षा जास्त बजेट आणि उत्पन्न मुंबईचे आहे. तिची सत्ता ज्या विचारधारेच्या पक्षाकडे असेल तोच पक्ष त्या महानगरीचा विकास आणि विस्तार करू शकतो. जे पक्ष धंदेवाईक असतात,ज्यांची विचारधारा विषमतावादी असते ते सर्वांचा विकास व विस्तार होणार नाही यांचाच विचार करीत असतात. ते स्वतःचा आर्थिक विकास व कल्याण कसे होईल यांचेच नियोजन करीत असतात.पेशवाई संपल्यावर ब्रिटिशांनी सर्वच शहराचा विकास करण्यासाठी दळणवळणाची साधन उपलब्ध करून दिली,मुंबई बंदराचा विकास,कापड बनविणाऱ्या गिरण्या इतर शहराशी जोडण्यासाठी रेल्वेचा विकास व विस्तार ब्रिटिशांनी केला.म्हणूनच मुंबईची तुंबई कधी झाली नाही.मग आताच मुंबईची तुंबई कोणा मुळे होते ?.
       भारताची औद्योगिक राजधानी कोणती असे कोणी विचारले तर आपण काय उत्तर देणार?.दिल्ली,कोलकाता,पाटणा, हैदराबाद, बेंगुरुर,अहमदाबाद,अजमेर या शहराची नांवे घेणार नाही नां?.कारण विद्यार्थीदशे पासुन आपल्याला प्राथमिक शिक्षण घेतांना शिकविल्या जाते की भारताची औद्योगिक राजधानी मुंबई आहे.कापड गिरण्यामुळे मुंबई ची ओळख जागतिक पातळीवर होती.त्याच पद्धतीने जागतिक बाजारपेठेत मुंबई हे सर्वात मोठे मालवाहतूक करणारे प्रसिध्द बेट होत.अनेक देशाची मालवाहतूक करणारी जहाज हे मुंबई बेटावर नांगर टाकून चार आठ दिवस विश्रांती घेत होती.तेव्हाही आजच्या सारखा मुसळधार पाऊस पडत होता. मुंबई चारी बाजूने पाण्याने वेडली जात होती पण रस्त्यावर खड्डे पडत नव्हते किंवा रस्ते वाहून जात नव्हते.कारण ती बनविणारे कामगार कर्मचारी अधिकारी आणि ठेकेदार प्रामाणिकपणे इमानदारीने मुंबईच्या नागरिकांना सेवा देण्यासाठी रस्ते रोड बनवीत होते.कायदे तेव्हा ही होते आणि आज भी आहेत. पण त्या कायद्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करणारे तेव्हा होते म्हणूनच सर्व यंत्रणा घाबरून इमानदारीने काम करीत होती.आज काय होते ?. तेव्हा मुंबईची तुंबई कधी झाली नाही.मग आताच मुंबईची तुंबई कोणा मुळे होते?.
     मुंबईत यांची अंमलबजावणी ताबडतोब जाग्यावर होते. टूव्हीलर वाल्यानी हेल्मेट घातले नाही तर ५०० रुपये दंड. नोपार्किंग मध्ये गाडी उभी केली ३०० रुपये दंड.नोएन्ट्री मध्ये गाडी घातली २०० रुपये दंड, नंबरप्लेटचा रंग उडाला २०० रुपये दंड.ट्रिपल सीट बसले २००० रुपये दंड.ज्या दिवशी आम्ही टू व्हीलर, त्रि व्हीलर, फोर व्हीलर गाडी विकत घेतो त्याच दिवसा पासुन आम्हाला रोड टॅक्स भरावा लागतो.मग या मुंबई शहराचे रस्ते,रोड चांगले व मजबूत ठेवण्याची व गटारे,नाले मिठा नदी साफ करून ठेवण्याची जबाबदारी कोणाची?.                                                                   मुंबई आमची सांगणारे नेमके रस्त्यावर,रोडवर खड्डे पडल्यावर गटार,नाले भरल्यावर कुठे मरतात?. बाकीच्या वेळी कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष, झुंझार,लढाऊ समाज सेवक, नगरसेवक, आमदार, खासदार म्हणून होडिंग लावुन भूमिपूजन आणि उदघाटन करतात.मग खड्डे पडल्यावर गटार,नाले भरल्यावर यांची काहीच जबाबदारी नसते काय?.का नाही रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांना शिक्षा होत?.यात या सर्व पदव्या लावणाऱ्या दलालांनी मोठ्या प्रमाणात कमिशन, टक्केवारी खाल्लेली असते.म्हणूनच ते मुंबई महानगरीशी बेईमानी करतात.म्हणूनच मुंबईची तुंबई होत असते.
भारताच्या औद्योगिक राजधानीत रस्त्याला खड्डे पडल्यावर, गटार,नाले भरल्यावर कुणालाच शिक्षा होत नाही?. चुकीचे स्पीड ब्रेकर बनविले तरी कुणालाच शिक्षा होत नाही?. सिग्नल नादुरुस्त असले तरीही कुणालाच शिक्षा होत नाही?.रस्त्यावर पाणी साठते म्हणून कुणालाच शिक्षा होत नाही?.रस्ते खोदून पुन्हा दुरुस्त होत नाही तरीही कुणालाच शिक्षा होत नाही?. शहरातील अस्वच्छ रस्ते,चौक तरीही कुणालाच शिक्षा होत नाही?. शहरातील अनेक फूटपाथवर अनेक पक्षांची कार्यालये तरीही कुणालाच शिक्षा होत नाही?. शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची पार्किंग पण कोणालाच शिक्षा होत नाही?. मात्र मुंबईतील सर्व नागरिक गुन्हेगार व दंडास पात्र आहेत! पण राजकीय कार्यकर्ते, नेते आणि प्रशासकीय अधिकारी गुन्हेगार व दंडास पात्र का नाही?. प्रशासनाची व राजकरण्याची कुठलीही नैतिक अथवा व्यावसायिक जबाबदारी नाही काय?. त्यांची प्रिंट मीडिया चॅनल मीडिया गांभीर्याने दखल का घेत नाही.त्या सर्वांचे तोंड बंद ठेवण्यासाठी योग्य ती टक्केवारी पोचली असते म्हणूनच नां?. मुंबईतील नागरिकांनी फक्त मेहनत करा, कष्ट करा, प्रामाणिकपणे टॅक्स भरा.आणि राजकीय नेत्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरातील तिजोरी भरा.सरकारी तिजोरी भरली तरी ती तिजोरी लुटण्याचा जन्मसिद्ध अधिकार प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांना व ठेकेदारांना मुंबईतील नागरिकांनी मतदार म्हणून दिला आहे. म्हणूनच मुंबईची तुंबई होते.
         महाराष्ट्राची राजधानी मुंबई.मराठी माणसांची मक्तेदारी असलेलं महानगर. महानगरपालिकामुळे मराठी माणसाचे ह्र्दय सम्राट म्हणून घेणारे नेते निर्माण झाले. त्यांची घोषणाच होती 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण त्यामुळे त्यांनी मराठी माणसाच्या मनावर मेंदूवर मुंबई वर राज्य केले. तेव्हा 80 टक्के कायमस्वरूपी सुरक्षित नोकरी करणारे मुंबईकर होते आणि 20 टक्के असंघटित मजूर मुंबईकर होते.आज चित्र संपूर्ण उलट झाले आहे. 20 टक्के कायमस्वरूपी सुरक्षित नोकरी करणारे मुंबईकर आहेत तर 80 टक्के असंघटित कामगारांच्या फौजा नाका कामगार,घरकामगार, फेरीवाले, रिक्षाचालक, टेम्पो, ट्रॅक,ग्रॅरेजवाले,सफाई कामगार,सुरक्षा रक्षक, ओला, उबेर टॅक्सीवाले इत्यादी 94 प्रकारचे असंघटित कामगार मुंबईत आहेत.मुंबईचा विकास व विस्तार करण्यात यांचा मोठा मौलिक वाटा आहे. त्यांची सनदशीर मार्गाने कामगार  कुठेही नोंदणी नाही.परंतु ते मुंबईतील मतदार म्हणुन ओळख मात्र शंभर टक्के आहे.त्यामुळे मराठी माणसाचे ह्रदय सम्राट गेल्या साठ वर्षात एक हाती सत्ता गाजवितात.
       बाकीचे राजकीय पक्ष महाराष्ट्रावर राजकीय सत्ता गाजविण्यासाठी राजकारण करीत असतात.राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून समाजाच्या उन्नतीसाठी गांव ते शहर जोडणारे रस्ते,रोड,नाले ब्रिज मजबूत बांधकाम करणे आवश्यक असतात.त्यासाठी प्रत्येक नगरसेवक,आमदार, खासदार यांना विकास निधी मिळतो. पण आज एकाही पक्षाचा लोकप्रतिनिधी असा नाही जो बिना पैसे खाल्ल्या शिवाय कोणतेही काम करीत नाही.म्हणूनच मुंबईची तुंबई 
        कधी होते कळत नाही. तरी आम्ही विचारतो मुंबईची तुंबई कोणा मुळे होते ?.
मुंबई ही सोन्याची लंका म्हणून ओळखल्या जात होती तर कष्टकरी कामगारांना ती सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटत होती. खेड्या पाड्यातून किंवा परराज्यातून आलेला माणूस मुंबईत कधीच उपाशी राहू शकत नाही.ती मुंबई दरवर्षी पाण्यात बुडते. मुंबईकरांना रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न दरवर्षी पडतो.आजच्या विज्ञान युगात कोणतीही वस्तू खरेदी केली तर त्यांची ग्रारंटी, वारंटी दिल्या जाते.मग मुंबईतील रोड बनवितांना ठेकेदारा कडून कोणतीही हमी का घेतली जात नाही?.एकाच पावसाळ्यात रोडवर खड्डे पडतात व गटार,नाले वाहून जातात तरी कोणत्याही इंजिनियर व ठेकेदारावर कडक कारवाई होत नाही. म्हणजेच त्याला हे दोघेच जबाबदार नाही.तर त्यात अनेक वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेते भागेदारी करणारे आहेत.त्यामुळे कोणत्याही एका व्यक्ती वर कडक कारवाई झाली तर तो इतरांचे नांवे सांगितल्या शिवाय राहणार नाही.या भीतीनेच मुंबईतील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी रोडच्या खड्ड्यात,गटार,नाले बांधकामे केलेल्या कामावर जास्त लक्ष घालत नाही.हे सत्य आता मुंबईतील मराठी माणूस चांगलाच जाणुन आहे.मुंबई ही देशाची नव्हे जगाची शान आहे तीचा नांव लौकिक वाढला पाहिजे. राजकीय पक्षांनी आपले तात्विक भांडणे आणि व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून मुंबई खड्डा मुक्त,गटार,नाले स्वच्छ करण्यावर भर द्यावा.केवळ पावसाळ्यात मुंबईतील सर्वांचे खुप हाल होतात.उरलेल्या दिवसात मुंबईत असणार किंवा दोनचार दिवसासाठी पाहुणा आलेला माणूस मुंबई शहराचा मनसोक्त आनंद घेतो.म्हणूनच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्याची भाषा करणाऱ्या व मराठी माणसाचे ह्रदय सम्राट म्हणून घेणाऱ्यांनी आपण किती स्वार्थी आहोत आणि किती मुंबईतील रहिवासी,नागरिक, मतदारांशी प्रामाणिक आहोत हे मुंबई खड्ड्यात व गटार, नाले स्वच्छ न करणाऱ्यांवर कडक कारवाई करून दाखवावी. अन्यता आम्हाला खात्री होईल की मुंबईची तुंबई कोणा मुळे होते ?. जे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा साठ वर्ष वापर करून त्यांच्याशी बेईमानी करू शकतात. त्यांना मुंबईची तुंबई करण्यात कमी पणा वाटणार नाही.हे त्रिवार सत्य आहे. कोणी विसरू नये.                                                                                बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे हृदय सम्राट,मराठी माणसाचा भाषाचा सम्राट यांचे घर असलेला विभाग यावेळी त्या मातोश्री समोर पाणी साचले, तुंबले नाही, तरी मुंबईत पावसाचे पाणी तुंबले नाही असा रोख ठोक,धरठोक बोलणारे लिहणारे खासदार सांगतात,आणि सुंदर बेशरम पणे कविता सादर करतात.काय म्हणाल या वृत्तीला?.महाराष्ट्रातील तमाम मराठी तरुणांनो विचार करा.मुंबईची तुंबई कोणा मुळे होते ?.

                                                                                            सागर रामभाऊ तायडे

                                                                                भांडुप, मुंबई

                                                                                             9920403859.