मुसांडवाडी येथे बळीराजाची बैठक संपन्न

मुसांडवाडी येथे बळीराजाची बैठक संपन्न

कराड/प्रतिनिधी :  
                        मुसांडवाडी ता. करफ येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी 2 रोजी सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संघटनेच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार सर्व शेतकरी बांधवांनी केला. 
                       यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उपाध्यक्ष सुनील कोळी, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, मुसांडवाडीचे सरपंच प्रल्हाद जगताप, उपसरपंच दाऊद पटेल, विकास सोसायटीचे चेअरमन दादा सय्यद , ग्रा.प. सदस्य इस्माईल पटेल, हमीद पटेल, आक्रम पटेल, के.जी.एन ग्रुपचे अध्यक्ष निसार पटेल, इम्रान पटेल, अकबर पटेल, रहीम पटेल, समीर सय्यद, आशरप पटेल, सलमान मुलाणी, दशरथ पाटोळे, आत्माराम पाटोळे, सागर शिंदे, दादा पटेल , जमीर पटेल व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
                       दरम्यान, निवडणूक आली की राजकीय पुढारी मतदान मागण्यापुरते येतात व नंतर गायब होतात. अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. तसेच साजिद मुल्ला यांच्या उमेदवारीमुळे बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विधानसभेत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडण्यासाठी आणि शेतकरी चळवळ वाढण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.