मटन विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई संचारबंदी आदेशाचे उल्लंघन हिंगनोळे येथील घटना

जमावबंदी,संचारबंदी व आपत्ती  निवारण कायद्याच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हिंगनोळे ता.कराड येथील दोन मटन विक्रेत्यांवर उंब्रज पोलिसांनी कारवाई केली आहे.सदरची कारवाई शुक्रवार दि.२७ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास केली.

मटन विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई  संचारबंदी आदेशाचे उल्लंघन हिंगनोळे येथील घटना

उंब्रज / प्रतिनिधी
जमावबंदी,संचारबंदी व आपत्ती  निवारण कायद्याच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हिंगनोळे ता.कराड येथील दोन मटन विक्रेत्यांवर उंब्रज पोलिसांनी कारवाई केली आहे.सदरची कारवाई शुक्रवार दि.२७ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास केली.

गुलाब  अहमद खालीपा (वय६०),विठ्ठल भिकू सरगर  (वय५०) दोघे रा.हिंगनोळे ता.कराड अशी कारवाई केलेल्यांची नांवे आहेत.

याबाबत पोलिसांनी माहिती अशी,जमावबंदी,संचारबंदी व आपत्ती  निवारण कायद्याचा आदेशाचा असताना चिकण मटण विक्री करण्यासाठी बंदी असताना हिंगनोळे येथील रोडकडेला गुलाब  खालीपा व विठ्ठल सरगर यांनी बोकड कापून मटन विक्री करण्याच्या उद्देशाने लोकांची गर्दी जमवली यावरून दोघा जणांवर उंब्रज पोलिसांनी कारवाई केली. सदर कारवाईची नोंद उंब्रज पोलिस ठाण्यात झाली आहे.