वडगांव(उंब्रज)येथील मटण विक्रेत्यावर गुन्हा दाखल

जमावबंदी,संचारबंदी व आपत्ती  निवारण कायद्याच्या आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी वडगांव ता.कराड येथील एका मटन विक्रेत्यांवर उंब्रज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

वडगांव(उंब्रज)येथील मटण विक्रेत्यावर गुन्हा दाखल

उंब्रज / प्रतिनिधी

जमावबंदी,संचारबंदी व आपत्ती  निवारण कायद्याच्या आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी वडगांव ता.कराड येथील एका मटन विक्रेत्यांवर उंब्रज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

सदरची कारवाई  रविवार दि.२९ रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास करण़यात आली सुरज शब्बीर मुल्ला वय.२९ वर्षे रा. वडगांव ता.कराड जि. सातारा अशी कारवाई केलेल्याचे नांव आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती अशी,जमावबंदी,संचारबंदी व आपत्ती  निवारण कायद्याचा आदेशाचा असताना चिकण मटण विक्री करण्यासाठी बंदी असताना वडगांव (उंब्रज) 
येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे पाठीमागे रस्त्याचे कडेस
मटण विक्री करत असताना मिळून आला.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांनी कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या  संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून  तसेच मटन विक्रीची बंदी असताना सुद्धा आरोपी मजकूर हे मटण विक्री करीत असताना मिळून आले म्हणून उंब्रज पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.