नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रती पी. डी. पाटील कुटुंबियांची कृतज्ञता

शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही नगरपालिकेचे सर्व कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यातच सततचा पावसामुळे सफाईसह दैनंदिन कामांचाही त्यांच्यावर ताण येत असून या कर्मचाऱ्यांच्याच आरोग्याची हेळसांड होत आहे. परंतु, सध्य परिस्थितीत उपचारासाठीही त्यांना एकमेकांकडून उसनवारी करून पैसे उभा करावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता या कर्मचाऱ्यांना तातडीच्या वैद्यकिय कामासाठी पी. डी. पाटील कुटुंबियांनी मदतीचा हात देत त्यांना धनादेश दिला आहे. यातूनच पाटील कुटुंबियांची नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रती असलेली कृतज्ञता दिसून येते.

नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रती पी. डी. पाटील कुटुंबियांची कृतज्ञता
पालिका कर्मचारी प्रतिनिधींकडे धनादेश सुपूर्द करताना गटनेते सौरभ पाटील, सोबत इतर मान्यवर
तातडीच्या वैद्यकिय कामासाठी मदत : गटनेते सौरभ पाटील यांच्याहस्ते कर्मचाऱ्यांना धनादेश  सुपूर्त

कराड/प्रतिनिधी :

         शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही नगरपालिकेचे सर्व कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यातच सततचा पावसामुळे सफाईसह दैनंदिन कामांचाही त्यांच्यावर ताण येत असून या कर्मचाऱ्यांच्याच आरोग्याची हेळसांड होत आहे. परंतु, सध्य परिस्थितीत उपचारासाठीही त्यांना एकमेकांकडून उसनवारी करून पैसे उभा करावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता या कर्मचाऱ्यांना तातडीच्या वैद्यकिय कामासाठी पी. डी. पाटील कुटुंबियांनी मदतीचा हात देत त्यांना धनादेश दिला आहे. यातूनच पाटील कुटुंबियांची नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रती असलेली कृतज्ञता दिसून येते.

         पालिकेतील लोकशाही आघाडीच्या सभागृहात शुक्रवारी 14 रोजी गटनेते सौरभ पाटील यांच्याहस्ते सबंधित कर्मचाऱ्यांचे  प्रतिनिधी आनंदा खवळे, यूवराज भोसले, मारूती काटरे, सागर सातपूते, भास्कर काटरे, अतूल माने,  सूनिता आठवले यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, जयंत बेडेकर ऊपस्थित होते.

         शहरात सध्या कोरोनाच्या फैलावात झपाट्याने वाढत होत असून सदर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनासह पोलीस व नगरपालिका अधिकारी प्रयत्नशील आहेत. मात्र, या परिस्थितीत पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यासाठी तत्परतेने कार्यरत असून त्यामध्ये  नगरपालिकेचे आरोग्य, स्वच्छता व सांडपाणी विभागातील कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.  गेले पाच महिन्यांपासून नागरिकांच्या सेवेसाठी ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत अहोरात्र आरोग्य सेवकाचे  काम करत आहेत. मात्र, त्यातच काही दिवसांपासून पावसाचीही रिपरिप वाढली असूूून कर्मचाऱ्यांवरील दैनंदिन कामांचा ताण आणखीनच वाढल्याचे दिसून येत आहे.

         या कामाच्या वाढत्या ताणामुळे त्यांच्या आरोग्याकडेही पाहायला त्यांना उसंत मिळत नाही. त्यातच सर्वांसह सध्याच्या आर्थिक परिस्थितीची झळ त्यांनाही बसल्याने स्वतःच्या उपचारासाठीही त्यांना एकमेकांकडून उसनवारी करून पैसे उभा करावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता आरोग्य, स्वच्छता व सांडपाणी विभागातील कर्मचाऱ्यांना तातडीच्या  वैद्यकिय कामासाठी पी. डी. पाटील  कुटुंबियांनी धनादेश देऊन मदतीचा हात दिला आहे. एकंदरीतच यामधून पाटील कुटुंबियांची नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रती असलेली ल्या कृतज्ञता दिसून येत आहे. 

        दरम्यान, याप्रसंगी स्व. पी. डी. पाटील साहेब यांची शिकवण, लोकशाही आघाडीचे नेते ना. बाळासाहेब पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सूभाषकाका पाटील, जयंतकाका पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सर्व लोकशाहीचे सदस्य शहराच्या सेवेसाठी कार्यरत राहू तसेच शहरासह नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र काम करणार्या या सर्व पालिका कर्मचार्यांच्या पाठिशीही नक्कीच ठामपणे राहू, असा विश्वासही कर्मचाऱ्यांना सौरभ पाटील यांच्यासह  उपस्थितांनी दिला आहे. 

*यापुढेही कर्मचाऱ्यांना संकटकाळी योग्य ते सहकार्य करू : - 

आदरणीय पी. डी. पाटील साहेबांनी प्रदीर्घ कालावधीत कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहताना नेहमीच पालिका कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न केले आहेत. तोच आदर्श समोर ठेवून लोकशाही आघाडी कार्यरत आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आज देण्यात आलेला धनादेश केवळ मदत म्हणून नव्हे तर कृतज्ञतापूर्वक देण्यात आला आहे. यापुढेही  नगरपालिका कर्मचार्यांच्या संकटकाळी पाटील कुटुंबीय व आघाडीच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू 

            - सौरभ पाटील (गटनेते, लोकशाही आघाडी)