नागरीकांनी विनाकारण बाहेर पडु नये – आ. प्रशांत परिचारक

आ.प्रशांत परिचारक यांनी कोरोना व्हायरस संबंधी नगरपरिषदेने विविध उपाययोजना कराव्यात अशा सुचना दिल्या. नागरीकांनी त्यांच्या घरामध्ये देश-विदेश व परराज्यातुन, परजिह्यातुन आलेल्या नागरीकांच्या नोंदी पंढरपूर नगरपरिषदेकडे ऑनलाईन नोंदवाव्यात . नगरपरिषदेचे कर्मचारी जेव्हा आपल्या घरी येतील त्यांच्याकडे न लपविता त्यांच्या नोंदी द्याव्यात. तसेच शहरातील नागरीकांनी विनाकारण बाहेर पडु नये असे आवाहन केले

नागरीकांनी विनाकारण बाहेर पडु नये – आ. प्रशांत परिचारक

पंढरपूर/ प्रतिनिधी

 संपुर्ण जगात आणि देशभरात करोना व्हायरस या साथरोगाने थैमान घातले आहे. नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. शहरतील नागरीकांमध्ये या रोगा विषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. पंढरपूर नगरपरिषदेने यादृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. या साथ रोगास आळा घालण्यासाठी पंढरीत  बाहेरून दररोज येणाऱ्या नागरिकांनी याबाबतची नोंद नगरपरिषदेत नोंदविणे गरजेचे आहे या नोंदी ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येतील अशी सूचना आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या बैठकीत केली.
 करोना व्हायरसला आळा घालण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांनी आ. प्रशांत परिचारक यांच्या समवेत नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक यांनी कोरोना व्हायरस संबंधी नगरपरिषदेने विविध उपाययोजना कराव्यात अशा सुचना दिल्या. नागरीकांनी त्यांच्या घरामध्ये देश-विदेश व परराज्यातुन, परजिह्यातुन आलेल्या नागरीकांच्या नोंदी पंढरपूर नगरपरिषदेकडे ऑनलाईन नोंदवाव्यात . नगरपरिषदेचे कर्मचारी जेव्हा आपल्या घरी येतील त्यांच्याकडे न लपविता त्यांच्या नोंदी द्याव्यात. तसेच शहरातील नागरीकांनी विनाकारण बाहेर पडु नये असे आवाहन केले 
पंढरपूर नगरपरिषदेच्या नगरसेवकांना या काळात आ.परिचारक हे वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. यानुसार प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांनी आपल्या  प्रभागात येणा-या नगरपरिषदेच्या कर्मचा-यांबरोबर समक्ष हजर राहुन नागरीकांना कोरोना व्हायरस संबंधी जनजागृती करावी असे आवाहन केले होते .त्यानुसार आज नगराध्यक्षा साधना नागेश भोसले आणि मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या मार्गदशर्नाखाली ८६ कर्मचा-यांच्या टिमद्वारे स्थानिक नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी १७ प्रभागामध्ये घरोघरी जावून परगावावरुन आलेल्या नागरीकांच्या सर्व्हेचे काम केले. शहरामध्ये अग्निशामक पाण्याच्या टँकरद्वारे व ४ ब्लोअर मशीन व १५ हातपंपाद्वारे निर्जंतुकिकरण करण्याची मोहिम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली आहे. शहरातील किरणा दुकान व औषध दुकाने येथे गर्दी होवु नये म्हणुन प्रत्येक दुकानासमोर ग्राहकांमध्ये अंतर राहण्याच्या दृष्टीने मा.उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या सुचनेनुसार चुन्याचा वापर करून चौकोन आखण्यात आले आहेत.  शहरातील भाजी मंडईमध्ये विशेषत: भादुले हौदाजवळ होणारी गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही भाजी व फळ विक्रेत्याला एका ठिकाणी बसु न देता हात गाडी द्वारे प्रत्येक गल्लोगल्ली जावुन भाजी व फळे प्रत्येक नागरीकांच्या दारात मिळण्याच्या दृष्टीने ओळखपत्रे देण्यात आली आहेत.