मनोजदादानी घेतली कोरोनासाठी आढावा बैठक

प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथील डॉक्टर व कर्मचारी यांची कोरोना रोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी वर्णे जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार, डॉ. सातपुते ,सरपंच कोमल देशमख उपस्थित होते

मनोजदादानी घेतली कोरोनासाठी आढावा बैठक
प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथील डॉक्टर व कर्मचारी यांची कोरोना रोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी वर्णे जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे यांनी आढावा बैठक घेतली

सातारा /प्रतिनिधी
 प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथील डॉक्टर व कर्मचारी यांची कोरोना रोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी वर्णे जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार, डॉ. सातपुते ,सरपंच कोमल देशमख उपस्थित होते 
         संपूर्ण भारतात आणि जगात कोरोना सारख्या महामारीने हाहाकार पसरला असताना प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथील डॉ. व आरोग्य कर्मचारी यांची मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना  रोगाला प्रतिबंध करण्यास उपाय योजनासाठी बैठक झाली.यावेळी नांदगाव प्राथमिक केंद्र हद्दीत संशयीत रुग नसून एकूण ७ रुग परदेशातुन आले असून, त्याची १४ दिवसाची कॉरोंटायन चालू आहे, हजारो लोक मुंबई, पुणे व इतर शहरातून आले असून ,त्यांनी योग्य ती काळजी घेण्याची व आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. 
     पंतप्रधान मोदीनी 21  दिवस संचार बंदी जाहीर केली असून, राज्य सरकार व प्रशासनास सहकार्य करून कोणीही घराबाहेर पडू नये म्हणून विनंती करण्यात आली. प्रत्येकाने काळजी घेतली तर कोरोना ग्रामीण भागात येणार नाही खबरदारी म्हणून प्रत्येक गावातील ग्रामपंचायत व आरोग्य अधिकारी यांनी ग्रामपंचायत हद्दीत औषध फवारणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या सरकारच्या सूचनांचे पालन करून  अफवानवर विश्वास ठेवू नका जर कोणाला शंका असेल तर आरोग्य  अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले