राष्ट्रीय कौन्सिल मेंबर म्हणून गोरख तावरे यांची निवड

राष्ट्रीय कौन्सिल मेंबर म्हणून गोरख तावरे यांची निवड

कराड/प्रतिनिधी : 
                        असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय कौन्सिल मेंबर म्हणून कराड येथील राजसत्यचे संपादक गोरख तावरे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र संघटेचे राज्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी दिले आहे.
                        यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, प्रविण पाटील, रंगराव शिपुकडे, अल्ताफ संन्दी, तेजस्विनी सुर्यवंशी, ए. आय. मुजावर, अनिल आपटे, राजश्री सुर्यवंशी उपस्थित होते. आप्पासाहेब पाटील यांनी गोरख तावरे यांना नियुक्तीपत्र देऊन यथोचित सत्कार केला. असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय कौन्सिल मेंबर म्हणून कराडचे साप्ताहिक राजसत्यचे संपादक गोरख काशिनाथ तावरे यांची राष्ट्रीय अध्यक्ष के.डी. चन्दोलाजी यांच्या सहमतीने लॉनसिंग टेनन, राष्ट्रीय सचिव यांनी नियुक्ती केली आहे.
                     असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या संघटनेचे कार्य भरीव व गतीमान होण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. वृत्तपत्रक्षेत्रातील प्रदिर्घ अनुभवाचा या संघटनेच्या वाढीसाठी व वृत्तपत्राच्या समस्या सोडविण्यासाठी नक्कीच उपयोग केला जाईल. त्याचबरोबर राज्यातील सर्व पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील संघटना बळकट करण्याचे कार्य केले जाईल अशी हमी गोरख तावरे यांनी यावेळी दिली.