नवीन कृष्णा पुलावर नवनवीन खड्यांची मालिका

नवीन कृष्णा पुलावर नवनवीन खड्यांची मालिका

कराड/प्रतिनिधी : 

                        कराड-विटा मार्गावर कराड शहर व सैदापूर दरम्यान असलेल्या नवीन कृष्णा पुलाची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. येथील जुना कृष्णा पुल क्षतीग्रस्त झाल्यापासून त्यानजीक उभारण्यात आलेल्या नवीन पुलावरून सध्या दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा वाढता ताण, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि कामातील हलगर्जीपणा यामुळे नवीन कृष्णा पुलावर नवनवीन खड्यांची मालिका निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.