कोर्टीत गँस सिलिंडरचा स्फोट; दोन घरे भस्मसात

कोर्टी ता.कराड येथे भर दुपारी गँस  सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन घरे भस्मसात झाली आहेत.  दुर्घटनेत घरे व संसार उपयोगी साहित्य जळून सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.सुदैवाने सहा मुलांसह एक महिला स्फोटातून बचावली.

कोर्टीत गँस सिलिंडरचा स्फोट; दोन घरे भस्मसात
कोर्टी येथील आगीत भस्मसात झालेली घरे

पाच लाखांचे नुकसान,गरीब कुटूंबावर काळाचा घाला

प्रतिनिधी / उंब्रज
    
           कोर्टी ता.कराड येथे भर दुपारी गँस  सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन घरे भस्मसात झाली आहेत.  दुर्घटनेत घरे व संसार उपयोगी साहित्य जळून सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.सुदैवाने सहा मुलांसह एक महिला स्फोटातून बचावली.या घटनेने कोर्टी गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.त्यानंतर अग्निशामक दलाच्या बंबानी आगीवर नियंत्रण मिळवले. या दोन घरांशेजारी इतर घरे नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
            आगीत माणिक जयसिंग भिंगारदेवे व जनार्दन निवृत्ती नांगरे यांची घरे जळून भस्मसात झाली असुन रोख रक्कम, सोन्याचे दागिने व संसार उपयोगी  साहित्य जळून खाक झाले.आहेत याबाबत अधिक माहिती अशी की कोर्टी ता. कराड येथील जि.प शाळेकडे जाणाऱ्या रोडलगत माणिक भिंगारदेवे व जनार्दन नांगरे यांची घरे आहेत. शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास एका  घरात अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी या घराकडे धाव घेतली. उन्हाचा पारा असल्याने  स्फोटानंतर क्षणार्धात आगीने.रौद्ररूप धारण केले त्यामुळे  मोठ्या प्रमाणात व धुराचे लोट व ज्वाळा बाहेर पडू लागल्या. काही मिनिटात दोन्ही घरे  आगीच्या भक्षस्थानी पडली. आगीत सुमारे दोन तोळे सोने, रोख रक्कम तसेच संसारोपयोगी साहित्य होऊन पाच लाखांवर नुकसान झाले आहे.  सिलेंडरचा स्फोट झाला तेव्हा दोन्ही घरात मिळून सहा लहान मुले व एक महिला होती मात्र सुदैवाने ते बचावले. 
    ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जयवंत शुगर कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला व संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. माणिक भिंगारदेवे व जनार्दन नांगरे यांची दोन्ही कुटुंबे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात या घटनेने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.