नॉन कोविड हाँस्पिटलला ओ.पी.डी सक्ती करा - भीम आर्मीची मागणी

नॉन कोविड हाँस्पिटलला ओ.पी.डी सक्ती करा - भीम आर्मीची मागणी
जावेद नायकवडी (भीम आर्मी अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र)

भीम आर्मीची मागणी 

 कराड/प्रतिनिधी :

       सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व हॉस्पिटल फुल्लं आहेत. मात्र, बहुतांशी हॉस्पिटलमध्ये नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे किरकोळ आजारांवरही उपचार होत नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. यासाठी कोविड हॉस्पिटल व्यतिरिक्त अन्य नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये ओ.पी.डी. सुरु ठेवणे सक्तचे करावे. अन्यथा भीम आर्मी वेगळ्या पध्दतीने आंदोलन करेल, अशी मागणी भीम आर्मीच्या वतिने  जावेद नायकवडी व संतोष थोरवडे यांनी केली आहे.