श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व  पंचगंगेच्या  पाणी पातळीत आठ फुटाने वाढ

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व  पंचगंगेच्या  पाणी पातळीत आठ फुटाने वाढ
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त्त मंदिरामध्ये कृष्णा नदीचे पाणी (छाया – प्रशांत कोडणीकर) 

 

शिरोळ / प्रतिनिधी

         सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी 
लावल्यामुळे शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व 
पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात आठ फुटाने वाढ झाली 
आहे.                                                                                                                                     
पाणी पातळी वाढलेने कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिर निम्याहून अधिक 
पाण्याखाली गेले आहे. तर नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिराजवळ कृष्णा 
नदीचे पाणी आले आहे.आज रात्री या वर्षातील पहिले दक्षिणद्वार होण्याची शक्यता 
आहे.दरम्यान परिसरात दमदार पाउस झालेने पेरणी करून पावसाची वाट पहात असलेला 
बळीराजा आनंदात आहे.

    वाढलेल्या नदीच्या पाणी पातळीमुळे नदीकाठी असलेल्या कुरणात पाणी शिरत असून 
शेतकरी वर्गाची नदीकाठच्या मोटारी काढण्याची व नदीकाठी असलेले गवत कापून 
घेणेची धांदल चालू आहे.कृष्णा नदी पेक्षा पंचगंगा नदीच्या पाण्याला  जोरात 
प्रवाह आहे. दरम्यान कृष्णा नदीचे पाणी वाढत असलेने येथील दत्त देव संस्थानचे कर्मचारी 
यांनी  मंदिर परिसरातील  नदीकाठचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम सुरु 
केले आहे.
 
.