ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी १३ जणांना निवड - रणजित जाधव

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार समितीच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या पुरस्कारासाठी १३ जणांची निवड करण्यात आली असून लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी १३ जणांना निवड - रणजित जाधव
रणजित खाशाबा जाधव (अध्यक्ष, खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य).

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी १३ जणांना निवड

रणजित जाधव : आदर्श वस्ताद, कुस्ती संघटक, कुस्तीगीर, महिला कुस्तीगीर, क्रीडा पत्रकार, कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर

कराड/प्रतिनिधी :

     ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार समितीच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या पुरस्कारासाठी एकूण १३ जणांची निवड करण्यात आली असून लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणजित जाधव यांनी दिली. 

     खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे २०२२ हे प्रथम वर्ष असून त्यासाठी राज्यभरातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार समितीकडे एकूण ६१ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले. त्यांची छाननी करून या अर्जांमधून ९ जणांची, तर समितीमार्फत ४ जणांची अशी एकूण १३ जणांची राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

    त्यामध्ये आदर्श वस्ताद पुरस्कार अर्जुनवीर काकासाहेब पवार, वस्ताद विश्वासराव हारुगले, आदर्श कुस्ती संघटक पुरस्कार पै. संग्रामसिंह कांबळे, पै. योगेश शेवाळे, आदर्श कुस्तीगीर पुरस्कार पै. बदाम मगदूम, पै. उमेश सुळ, आदर्श महिला कुस्तीगीर पुरस्कार पै. सोनाली तोडकर, पै. कोमल गोळे, जीवन गौरव पुरस्कार पै. शंकर पुजारी, वस्ताद कोथळी करमाने, आदर्श क्रीडा पत्रकार पुरस्कार वैभव गोंधळी, सचिन भोसले, तर कोरोना योद्धा पुरस्कार श्री. तातोबा पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. 

लवकरच पुरस्कारांचे वितरण 

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची नुकतीच १५ जानेवारी रोजी जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंतीदिनीच राष्ट्रीय पुरस्कार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार वितरण कार्यक्रम रद्ध करण्यात आला असून लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. 

      - रणजित खाशाबा जाधव (अध्यक्ष,खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य )