पाचवड फाटा येथे गॅरेज कामगाराचा खून 

पाचवड फाटा त. कराड येथे किरकोळ कारणावरून गॅरेज कामगाराचा खून झाल्याची घटना घडली. पाण्याची मोटार बंद करण्याच्या कारणावरून वेटरने बर्फ फोडण्यासाठी वापरण्याचे लाकडी दांडके गॅरेजमधील कामगाराच्या डोक्यात घातले.

पाचवड फाटा येथे गॅरेज कामगाराचा खून 

पाचवड फाटा येथे गॅरेज कामगाराचा खून 

 

बर्फ फोडण्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण : एकास अटक

 

कराड/प्रतिनिधी :

     पाचवड फाटा त. कराड येथे किरकोळ कारणावरून गॅरेज कामगाराचा खून झाल्याची घटना घडली. पाण्याची मोटार बंद करण्याच्या कारणावरून वेटरने बर्फ फोडण्यासाठी वापरण्याचे लाकडी दांडके गॅरेजमधील कामगाराच्या डोक्यात घातले. शुक्रवारी 19 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद राहुल मोहन यादव (वय 35रा. कालेटेक याने कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी याप्रकरणी वेटरला अटक केली आहे.

     रवी अशोक यादव रा. उत्तर प्रदेशसध्या रा. भैरवनाथ वर्क शॉप, पाचवड फाटा असे खून झालेल्याचे नाव आहे. तर रामप्रसाद उर्फ रामु परमेश्‍वर गोस्वामी रा. रामप्रसाद खेडाउत्तर प्रदेश असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

     याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी राहूल यादव याची पाचवड फाटा येथे भैरवनाथ अ‍ॅटो वर्क शॉप व सुरक्षा अ‍ॅटो ऑटोमोबाईल अशी दुकाने आहेत. त्याच्या दुकानात रवी यादव हा चार महिन्यापासून कामास असून तो दुकानातच राहत असतो. शुक्रवारी रात्री फिर्यादी सुरक्षा ऑटोमोबाईल दुकान बंद करून भैरवनाथ शॉपकडे येत असताना रवी यादवला रामप्रसाद हा बर्फ फोडण्याच्या लाकडी दांडक्याने मारत असल्याचे दिसले. हे पाहून फिर्यादी घटनास्थळाकडे पळत येत असल्याचे पाहून रामप्रसाद हातातील लाकडी दांडके तेथेच टाकून हॉटेल साईबालाजीमध्ये पळून गेला.

     त्यांनतर फिर्यादी राहुल यादव हा रवी यादव याच्याजवळ गेलो. यावेळी त्याच्या डोक्यातून व उजव्या कानाच्या मागून रक्त येत होते. तसेच तो निपचित पडला असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यांनतर फिर्यादी व साईबालाजी हॉटेलचे मॅनेजर चैतन्य कांबळेदिनेश भाटी यांच्या सहकार्याने जखमी रवी यादव याला कृष्णा हॉस्पीटलकराड येथे उपचारासाठी दाखल केले.  परंतु, डॉक्टरांनी रवी मयत झाला असल्याचे सांगितले. याबाबत राहुल यादव याने कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून रामू परमेश्‍वर गोस्वामी याला अटक केली आहे.