हळव्या मनाचा नेता मदतीला धावला

पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी मैदानात 

हळव्या मनाचा नेता मदतीला धावला

हळव्या मनाचा नेता मदतीला धावला

पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी मैदानात 

उंब्रज / पप्रतिनिधी


पाल ता.कराड येथील तारळी नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कराड उत्तरचे आमदार तसेच पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी केली.संपूर्ण पाल गावामध्ये चिखलातून मार्ग काढत प्रत्येक गल्ली आणि वस्ती ना.पाटील यांनी नजरेखाली घातली आणि झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या नुकसानीचा आढावा घेतला यावेळी ग्रामस्थांची आस्थेवाईकपणे चौकशी करताना धीर दिला तसेच वरिष्ठ पातळीवर बैठक आयोजित करून नुकसान भरपाई साठी प्रयत्न करणार असल्याचे पाल व वडगांव येथील शेतकरी, व्यावसायिक, छोटे दुकानदार यांना  आश्वासन दिले आहे.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील जिल्हयावर आलेल्या अस्मानी संकटकाळात पायाला भिंगरी लावून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत.स्वभावाने मितभाषी असणारे पालकमंत्री बाळासाहेब पाटील जिल्ह्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाने गलबलून गेले आहेत. पाटण,कराड,सातारा अशा नुकसानग्रस्त भागात भेटी देऊन प्रशासनाला सूचना दिल्या जात असून नैसर्गिक आपत्तीच्या काळात हळव्या मनाचा नेता मदतीला धावत असल्याने जनतेला मोलाचा आधार मिळत आहे.

सातारा जिल्हयावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली असून पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा,इंदोली येथील पूरस्थितीची पाहणी यानंतर सातारा येथे जिल्हाधिकारी यांच्या समवेत पूरस्थिती बाबत आढावाआणि करावयाच्या उपाययोजना यांची बैठक यामुळे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या स्वभावाचा हळवा पैलू जनतेला पाहायला मिळत असून तळागाळातील जनतेच्या सेवेसाठी लोकसेवेचा वसा जपण्याची वृत्ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व पी डी पाटील यांची आठवण करून देत असल्याची चर्चा जिल्हावासीयांच्यात आहे.