पालिका निवडणूक पक्ष चिन्हावर पूर्ण ताकदीनिशी लढवणार - विक्रम पावसकर

गत नगरपालिका निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सुमारे सहा जागा जिंकल्या. तर अन्य ठिकाणी युती केली. मात्र, यावेळी आगामी नगरपालिका निवडणुक भाजप पक्ष चिन्हावर लढविणार असून सर्वच्या सर्व 33 जागा पूर्ण ताकदीनिशी लढविणार आहे.

पालिका निवडणूक पक्ष चिन्हावर पूर्ण ताकदीनिशी लढवणार - विक्रम पावसकर

 

पालिका निवडणूक पक्ष चिन्हावर पूर्ण ताकदीनिशी लढवणार

विक्रम पावसकर : शहरात नगराध्यक्षांच्या माध्यमातून चांगले काम - डॉ. अतुल भोसले

कराड/प्रतिनिधी :  

            गत नगरपालिका निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सुमारे सहा जागा जिंकल्या. तर अन्य ठिकाणी युती केली. मात्र, यावेळी पालिकेला युती करायची की नाही? यावर सदर बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये आगामी नगरपालिका निवडणुक भाजप पक्ष चिन्हावर लढविणार असून सर्वच्या सर्व 33 जागा पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली. 

           येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी 28 रोजी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, भाजप नेते शेखर चारेगावकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले,  नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, सुहास जगताप, माजी नगरसेवक मिलिंद पेंढारकर, मुकुंद चारेगावकर, रुपेश मुळे, उमेश शिंदे आदींची. उपस्थिती होती.

         जिल्हाध्यक्ष पावसकर म्हणाले, आजच्या बैठकीत सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुसार आगामी निवडणूकीत पक्ष चिन्हावर सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या काळात शेखर चरेगावकर, डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून शहरात बैठका घेऊन उमेदवार ठरवण्यात येतील. त्यामध्ये समाजातील कार्य, सामाजिक उपक्रमातील सहभाग व कोरोना आणि महापुर काळात केलेल्या कामावर 50 टक्के उमेदवार निवडीचा फॉर्मुला अवलंबण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

         डॉ. अतुल भोसले म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांनी सत्तेत नसतानाही कसे काम केले, ते कार्यकर्त्यांनी सदर बैठकीत सांगितले. शहरात गेल्या पाच वर्षात नगराध्यक्षांच्या माध्यमातून चांगले काम झाले आहे. त्यामुळे नक्कीच पक्षाची ताकद वाढली असून जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर आगामी पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानी घालणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.  

         तसेच देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्याचबरोबर विविध योजनांच्या माध्यमातून सरकारने केलेल्या कामांचा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच फायदा होणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

     दरम्यान, शहराध्यक्ष एकनाथ बागडी म्हणाले, शासकीय विश्रामगृहात आज भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यात  आगामी नगरपालिका निवडणूक, त्यासंदर्भात अध्यक्ष, बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यात आला. त्यामध्ये आगामी नगरपालिका निवडणुक भाजप पक्ष चिन्हावर लढविणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्वच्या सर्व २९ जागांसह वाढीव ४ जागा अशा एकूण 33 जागा पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.