महापूजेप्रसंगी मंदिरात ६० जणांची हजेरी ? तर मंदिर समिती कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाईची शक्यता ?

पंढरीतील विठ्ठल मंदिरात ४ एप्रिल रोजी चैत्री महापूजा करून मंदिरात गर्दी करून राज्यात लागू असलेल्या संचारबंदी आणि इतर अधिनियमांना धाब्यावर बसवल्या प्रकरणी मंदिर समिती सदस्य आ. सुजित सिंग ठाकूर आणि संभाजी शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु याप्रसंगी मंदिरात ६० हून अधिक नागरिक उपस्थित असल्याची माहिती पुढे येत आहे. यात इतर काही सदस्य तसेच मंदिराचे व्यवस्थापक सहकुटुंब आणि कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.याप्रकरणी पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी मंदिर समितीकडे केल्याची माहिती, सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिली आहे. हे फुटेज पोलिसांना प्राप्त झाल्यास या गुन्ह्याच्या व्याप्तीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

महापूजेप्रसंगी मंदिरात  ६० जणांची हजेरी ?  तर मंदिर समिती कार्यकारी अधिकारी  यांच्यावर कारवाईची शक्यता ?

पंढरपूर ( प्रतिनिधी )

पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरातील महापूजेत सहभागी झालेल्या मंदिर समिती सदस्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये भाजपचे आ. सुजितसिंह ठाकूर आणि शिवसेना नेते संभाजी शिंदे यांचा सहभाग आहे. याच प्रकरणात आणखी काही सदस्य आणि याप्रकरणी जबाबदार अधिकारी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. या महापूजेप्रसंगी मंदिरात ६० हून अधिक नागरिक सहभागी असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे येत आहे. यामुळे मंदिर समिती प्रशासनात खळबळ उडाली आहे.