पोलिसांचे आवाहन अन् बंदा हजिर...गरजूंच्या मदतीसाठी कोळी महासंघाचा पुढाकार

संचारबंदी काळात पंढरीतील गरजू तसेच निराधार नागरिकांना मदत करण्याचे काम कोळी महासंघ अविरतपणे करत आहे . शहरातील ४० ते ५० नागरिकांना अन्नधान्याची गरज आहे. ही माहिती पोलीस ठाण्याकडून कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावतराव यांना देण्यात आली, पण मदतीसाठी कार्य तत्पर असणाऱ्या सावतराव यांनी अन्नधान्यसह पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांचे आवाहन अन् बंदा हजिर...गरजूंच्या मदतीसाठी कोळी महासंघाचा पुढाकार

पंढरपूर ( प्रतिनिधी )

संचारबंदी काळात पंढरीतील गरजू तसेच निराधार नागरिकांना मदत करण्याचे काम कोळी महासंघ अविरतपणे करत आहे . शहरातील ४० ते ५० नागरिकांना अन्नधान्याची गरज आहे. ही माहिती पोलीस ठाण्याकडून कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावतराव यांना देण्यात आली, पण मदतीसाठी कार्य तत्पर असणाऱ्या सावतराव यांनी अन्नधान्यसह पोलीस ठाणे गाठले.

पंढरपूर शहरातील कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावतराव संचारबंदी काळात गोरगरिबांसाठी महासंघाच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचे काम नेटाने करीत आहेत. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे. शहरातील निराधार तसेच अडकून राहिलेले परराज्यातील नागरिक यांना दररोज जेवण देण्याचे काम कोळी महासंघाकडून केले जात आहे. याशिवाय माहिती मिळेल त्या ठिकाणी जाऊन गरजूंना अन्नधान्य तसेच गरजेच्या वस्तूंचा पुरवठा सावतराव यांच्यामार्फत होत आहे.

सोमवार दिनांक १३ एप्रिल रोजी अचानक पांडुरंग सावतराव यांना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातून फोन आला.  पोलिसांच्या नजरेत आलेल्या सुमारे ४० ते ५० नागरिकांना खाण्यापिण्यासाठी मदतीची गरज आहे, असे सांगण्यात आले. लागलीच पांडुरंग सावतराव यांनी पोलीस ठाणे गाठले व या गरजू ४० ते ५० नागरिकांना पुरेल इतके धान्य, साखर, तांदूळ, तेल इत्यादी वस्तू पोलीस ठाण्यास  जमा केल्या.  येथील ए.एस्.आय. डी.बी.वाघमोडे यांनी याबाबत सावतराव यांचे आभार मानले.