परळी-सज्जनगडचा पाणीप्रश्न कायमचा सुटला

परळी आणि सज्जनगडचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. त्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून परळी-सज्जनगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून ५ कोटी ७२ हजार रुपये निधी उपलब्ध केला आहे.

परळी-सज्जनगडचा पाणीप्रश्न कायमचा सुटला
आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

परळी-सज्जनगडचा पाणीप्रश्न कायमचा सुटला

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा : प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना मंजूर

सातारा/प्रतिनिधी :

     परळी आणि सज्जनगड येथील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून परळी-  सज्जनगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळवली आहे. त्यांनी या योजनेसाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून ५ कोटी ७२ हजार रुपये निधी उपलब्ध केला आहे.

     परळी गावातील ग्रामस्थांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा आणि सज्जनगडावरचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा, यासाठी एक सक्षम आणि मोठी पाणीपुरवठा योजना होणे गरजेचे होते. यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत परळी- सज्जनगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

     या योजनेंतर्गत उरमोडी नदीवर जॅकवेल, परळी गावच्या वरील बाजूस जलशुद्धीकरण केंद्र, ९० हजार लिटर क्षमतेची पाणी साठवण टाकी आणि परळी गावात पाणी वितरण व्यवस्था केली जाणार आहे. सज्जनगडावर पाणी पोहचवण्यासाठी दोन टप्प्यात कार्यवाही केली जाणार असून पम्पिंग स्टेशनद्वारे गडावर पाणी उचलून नेले जाणार आहे. तसेच गडावर पाणीसाठवण टाकी वितरण व्यवस्था केली जाणार आहे. या योजनेची निविदा प्रक्रिया आणि इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून लवकरच योजनेच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. काम लवकर सुरु करून वेळेत पूर्ण करा आणि काम दर्जेदार करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.