मल्हारपेठ वनपरिक्षेत्रातील मौजे उरूल येथील 'गुरवकी' नावाच्या मालकी क्षेत्रात मोराची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना अटक

शिकारीमुळे परीसरातील व पाटण तालुक्यातील वन्य पशू-पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. अशीच परीस्थिती राहिली तर, या परीसरातील तसेच पाटण तालुक्यातील मोर लवकरच नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोरांची चोरट्या मार्गाने होणारी हत्या थांबवण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाय योजना करावी व मोरांच्या तस्करीला पायबंध घालावा, अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.

मल्हारपेठ वनपरिक्षेत्रातील मौजे उरूल येथील 'गुरवकी' नावाच्या मालकी क्षेत्रात मोराची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना अटक

मल्हारपेठ प्रतिनिधी 
विकास कदम 

*मल्हारपेठ वनपरिक्षेत्रातील मौजे उरूल येथील 'गुरवकी' नावाच्या मालकी क्षेत्रात मोराची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना अटक*

दि.११/०४/२०२० रोजी सोशल मीडिया तसेच व्हाट्सपच्या माध्यमातून पाटण तालुक्यात एका गावात मोरांची शिकार करताना गावातील पुढारी  मंडळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सापडले आहेत. परंतु अध्याप कोणतीही हालचाल वनविभागाने केलेली नाही नक्की कारण काय? असा sms सोशल मीडिया व्हाट्सपद्वारे प्रसारित होत होता. मात्र वनविभाग प्रामाणिकपणे आपली भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले. बंदुका आणि विविध गावठी पध्दतीने मौजे उरूल ता. पाटण येथील ' गुरवकी' नावाच्या मालकी क्षेत्रात एक मोर (लांडॊरी) या राष्ट्रीय पक्षाची शिकार झाली असल्याचे वास्तव वनविभागाला समजताच तात्काळ वनपाल मल्हारपेठ श्री. भाट, वणरक्षक मल्हारपेठ श्री.घावटे, वणरक्षक बहुले श्री.बर्गे हे तिघेही घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोहचताच वनविभागाने बंदूकीसह इतर साहित्य जप्त करून मोर (लांडॊरी) ची शिकार करणाऱ्या २ आरोपींना अटक केली आहे.

सदर वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.११/०४/२०२० रोजी  मल्हारपेठ परिसरात राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचा स्वच्छंदी वावर असल्याने या मोरांना शिकारी आपले लक्ष्य करत आहेत. मौजे उरूल ता. पाटण येथील 'गुरवकी' नावाच्या मालकी क्षेत्रात एक मोर (लांडॊर) या राष्ट्रीय पक्ष्याची शिकार झाली आहे, असे समजताच तात्काळ वनपाल, मल्हारपेठ श्री भाट, वणरक्षक मल्हारपेठ श्री. घावटे, वणरक्षक बहुले श्री. बर्गे हे तिघेही घटनास्थळी पोहचले. त्यावेळी आरोपी १) विनायक बाळासो निकम वय ४२ वर्ष यांचे मालकी शेतातील पत्र्याच्या शेडजवळ TVS Jupiter Scooter गाडी नंबर MH-50 X-९३२२ गाडीचा रंग पांढरा. घटनास्थळी गाडीशेजारी मृत लांडॊर (मोर) डबल बार व बंदुक असे साहित्य मिळून आले. त्यावेळी जागेवर आरोपी १) विनायक बाळासो निकम वय ४२ वर्ष रा. उरूल ता.पाटण, आरोपी २) राहुल बाळासो निकम वय ४१ वर्ष हे मिळून आले. त्यांचेवर वनगुन्हा क्र. WL-०२/२०२० दि. ११/०४/२०२० अनन्वय भारतीय वन्यजीव (संरक्षक) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४४,४८७ व ५१ अनन्वय गुन्हा नोंद करून वरील सर्व साहित्य जप्त केले आहे. सदर गुन्हेकामी मा.उपवनसंरक्षक श्री. भारतसिंह हाडा साो , मा.सहा.वनसंरक्षक श्री.किरण कांबळे साो यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पाटण श्री.विलास काळे, वनपाल मल्हारपेठ श्री संजयकुमार भाट, वणरक्षक मल्हारपेठ श्री रामदास घावटे, वनरक्षक बहुले श्री दादाराव बर्गे, वनरक्षक चाफळ श्री विलास वाघमारे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना ताब्यात घेवून पुढील तपास करीत आहेत. 

*चौकट*

शिकारीमुळे परीसरातील व पाटण तालुक्यातील वन्य पशू-पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. अशीच परीस्थिती राहिली तर, या परीसरातील तसेच पाटण तालुक्यातील मोर लवकरच नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोरांची चोरट्या मार्गाने होणारी हत्या थांबवण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाय योजना करावी व मोरांच्या तस्करीला पायबंध घालावा, अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.