४५ वर्षानंतर पाटण बाजार समितीत "शंभुराज..

राष्ट्रवादी काँग्रेस पाटणकर गटाला धक्का

पाटण :-

 

पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाकडे ४५ वर्षे असलेली सत्ता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनलने खेचून घेतली. ऐकून १८ जागांपैकी १५ जागांवर देसाई गट विजयी झाला असून केवळ ३ जागांवर पाटणकर गटाला समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत ४ आणि सोसायटी मतदार संघातील ११ या सर्व जागांवर देसाई गटाने बाजी मारली. या निकालानंतर मंत्री शंभुराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदान मोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. 

 

पाटणकर गटाला फाजील आत्मविश्वास मिळाला

             पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या पंचवार्षिक निवडणुकीत पाटणकर गटाला जवळचे कार्यकर्ते, उमेदवार यांच्याकडून फाजील आत्मविश्वास मिळाला. कानात सल्ले फु़ंकणाऱ्या .... चौखडीच्या वेढ्यातून बाहेर पडण्याची मागणी या निवडणूकीच्या निमित्ताने पाटणकर गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी केली. विरोधक सर्व ताकदीने गनिमी काव्याने पाटणकर गटाला सुरुंग लावत आसताना येथे मात्र नेत्यापुढे केवळ दिखावा करणाऱ्या अती हुशार चार-चौघांचे सल्ले ऐकून रणनीती ठरवली जाते. याचा फटका अशा निवडणूकांवर बसतोय. सर्वसामान्य कार्यकर्ते मतदार यांना नेमके काय वाटते याचा विचार पाटणकर गटात होत नसल्याची खंत अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

       पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदारसंघातून ना. देसाई गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनल मधून विजयी उमेदवार-  सर्वसाधारणमधून जोतीराम काळे (९८५), समीर भोसले (९२१), अनुसूचित जातीतून सिद्धार्थ गायकवाड (९८१ ) , आर्थिकदृष्ठ्य दुर्बलमधून सुधाकर देसाई (९८१). पाटणकर गट (राष्ट्रवादी) शेतकरी विकास पॅनल ग्रामपंचायत मतदार संघातून पराभूत उमेदवार- सर्वसाधारणमधून मोहनराव पाटील (७६५) , सिताराम मोरे (७६०), अनुसूचित जातीतून उत्तम पवार  (७७७), आर्थिकदृष्ठ्य दुर्बल संदीप पाटील (७८०), ३९ मते बाद

 

              सोसायटी मतदार संघातून ना. देसाई गट शेतकरी परिवर्तन पॅनल विजयी उमेदवार सर्वसाधारण मधून- संग्राम मोकाशी (६२०), मानसिंग कदम (६१५), विलास गोडांबे (६१४), राजेंद्र पाटील (६२७), सिताराम सूर्यवंशी (६१७), बाळकृष्ण पाटील (६२९), दादासो जाधव (६१०), महिला प्रतिनिधी वैशाली शिंदे (६४९), जयश्री पवार (६३८), इतर मागासवर्ग नितीन यादव (६४०), भटक्या विमुक्तमधून धनाजी गुजर (६४०).

              सोसायटी मतदार संघातून पाटणकर गट (राष्ट्रवादी) शेतकरी विकास पॅनल पराभूत उमेदवार सर्वसाधारण गटातून-  दत्तात्रय कदम (५९५ ), झुंजार पाटील (६०३), सुभाष पाटील (६००), चंद्रशेखर मोरे (६०९), अभिजीत जाधव (५९३), दादासो जगदाळे (५९९), अमरसिंह पाटील (५९३), महिला प्रतिनिधीमधून रेखा पाटील (६१२), लतिका साळुंखे (६०१), इतर मागासवर्गीय उत्तम कदम (६१४), भटक्या विमुक्त मधून जगन्नाथ शेळके (६१३ ).

 

          व्यापारी मतदार संघातून पाटणकर गट (राष्ट्रवादी) शेतकरी विकास पॅनल विजयी उमेदवार

बाळासाहेब महाजन ५३६ मते, अरविंद पाटील ५२३,

ना.देसाई गट शेतकरी परिवर्तन पॅनल पराभूत उमेदवार

अरुण जाधव २८८, अविनाश नाझरे २८५, बाद ८ मते.

हमाल व तोलारी प्रतिनिधीमधून आनंदराव पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

           पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती मधील पाटणकर गटाची ४५ वर्षाची सत्ता उलथून लावल्यानंतर देसाई गटाच्या सर्व विजयी उमेदवारांची मतमोजणी केंद्रापासून जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. या विजयी उमेदवारां बरोबर मंत्री ना. शंभुराज देसाई, लो.बा.दे. साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, रविराज देसाई यांच्यासह कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.