रस्त्याचे रुंदीकरण की, प्रवासातील मोफत मरण

पी.डब्लू.डी ने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सर्वे केला असेल तर शेतकऱ्यांच्या वतीने पी.डब्लू.डी वर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे

रस्त्याचे रुंदीकरण की, प्रवासातील मोफत मरण
रस्त्याचे रुंदीकरण की, प्रवासातील मोफत मरण
रस्त्याचे रुंदीकरण की, प्रवासातील मोफत मरण

मल्हारपेठ / प्रतिनिधी
विकास कदम

कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाच्या अर्धवट कामामुळे आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे व आता पावसामुळे तर कराड-पाटण ते कोयनेपर्यंत अर्धवट असणाऱ्या कामामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक टुव्हीलर त्रीव्हीलर फोरव्हीलर चालकांना तसेच शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.पाऊस चालू झाल्यापासून अनेक प्रवाशांच्या गाडया घसरून पडल्यामुळे काहीजणांना मुक्कामार, पाय मुरगळने, हात चमकने अशा स्वरूपाच्या किरकोळ जखमींमधे वाढ होत आहे.तर काही ठिकाणी नुकत्याच मातीच्या भरावामुळे गाडी रूतण्याचेही प्रकार घडले असून हे प्रकार जरी सामान्य वाटत असले तरी येत्या पाऊस काळामधे याच मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत मृत्यूची सप्रेम भेट मिळेल यात शंका नाही.

पावसाळा आला तरी रस्ता नाही झाला
नेते बाकी म्हणतील विकास आम्हीच केला !
जीवघेण्या रस्त्यामुळे प्रवाशी मेला
बायकापोरं उघड्यावर संसार लयास गेला !
ज्याचा अपघात झाला तो जीवाला मुकला
जोतो म्हणे एकमेकात तोच साला चुकला !
कोण चूक कोण बरोबर ते कळेल पंचनामा केल्यावर
पण घडल्या अपघातामध्ये कोण तरी गेला ना वर !

या सगळ्याला जबाबदार कोण आणी या कामाला एवढा विलंब का झाला ? तर शेतकऱ्यांचा अडथळा, अडथळा ? तर त्यांच्या जमिनीत रस्ता रुंदीकरणाचे अतिक्रमण कंपनीचं म्हणनं आहे आम्हाला पी.डब्लू.डी ने जो सर्वे करून दिला त्यानुसार आम्ही काम करीत आहोत.तर मग शेतकऱ्यांना आपल्या जमीनीत अतिक्रमण होतंय असं वाटण्यालायक पी.डब्लू.डी नं सर्वे कसा काय केला आणी जर तो सर्वे केला त्यावेळी पी.डब्लू.डी ने संबंधीत शेतकऱ्याला विश्वासात न घेता कसा काय सर्वे केला, आणी जर शेतकऱ्याला विश्वासात घेवून हा सर्वे केला असेल तर मग शेतकऱ्यांनी आपली भुमिका बदलावी किंवा जर पी.डब्लू.डी ने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सर्वे केला असेल तर शेतकऱ्यांच्या वतीने पी.डब्लू.डी वर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण काहीही करून हे काम पूर्ण व्हायला पाहिजे अन्यथा अशा अपघातांमधून अनेक जन मृत्युमुखी पडतील अनेक संसार उघड्यावर पडतील अशा अनेक घटना घडतील यासाऱ्याला जबाबदार कोण ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतील.

कंपनीच्या नावाखाली घाटमाथा ते पाटण कराड रस्त्याची दुर्दशा याला स्थानिक नेते जबाबदार आहेत L&T च्या नावाखाली बांदकाम खाते झोपा काढत आहे हेळवाक पुलावरती पडलेले खड्डे हे दुर्घटनेचे आमंत्रण देत आहेत.सदर पूल हा पडलेल्या खड्यांमुळे कुमकुवत झाला असून बांदकाम विभाग सावित्री नदीवरील झालेल्या पुलाच्या दुर्घटनेची वाट बघत आहे की काय.वेळोवेळी संबंधित प्रशासनाला सांगून सुद्धा उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत तरी आठ दहा दिवसात काम नाही झाले तर कोयना विभागातील जनता पेटून उठेल व याला जबाबदार संबंधीत प्रशासन राहील.
-रामभाव मोहिते उपसरपंच नेचल

 

शालेय विद्यार्थी

आम्हाला शालेय शिक्षण घेण्याकरीता ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते.हा प्रवास करत असताना परिवहन महामंडळामध्ये आदीच कर्मचाऱ्यांचा व बसेसचा तुटवडा असल्यामुळे आम्हाला शिक्षण घेण्यासाठी पाटण ला येत असताना वेळेत गाडी नसल्यामुळे शाळेत वेळेत पोहचता येत नाही.कराड- चिपळूण चौपदरीकारणाचे सुरू असलेले अर्धवट काम आणी त्यातच सुरू असलेल्या पाऊसामुळे रस्त्यामध्ये चीकल झाल्याने गाडी वेळेत पोहचत नाही जी गाडी १५ ते २० मिनटामध्ये पाटण येत होती त्याच गाडीला आता ३० मिनटे लागतात आणी काही ठिकाणी चिकल झाल्याने वाहनांचे अपघात होत आहेत हे अपघात पाहून आम्हाला आमचा जीव मुटीत घालून शालेय शिक्षण घेण्यासाठी पाटणला यावे लागते तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित ठेकेदारांकडून या रोडचे काम लवकरात लवकरच पुर्ण करून घेण्यात यावे.