कराडचा अतिरिक्त पदभार प्रांतअधिकारी सुनील गाडे यांनी सार्थकी लावला

कराडचा अतिरिक्त पदभार प्रांतअधिकारी सुनील गाडे यांनी सार्थकी लावला

उंब्रज / प्रतिनिधी

कराडचे तत्कालीन प्रांतअधिकारी उत्तम दिघे यांची मिरजला बदली झाल्याने त्याच्या जागी नागपूर विभागातून येणारे प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांची बदली तांत्रिक कारणाने काही काळ थांबली होती.अशा वेळी पाटण प्रांतअधिकारी सुनील गाडे यांनी तात्पुरता कराडचा पदभार सांभाळला होता.दरम्यानच्या काळात पोलीस पाटील भरती तसेच रेल्वे भु संपादनच्या कामकाजात कोणताही खंड न होता सुरळीत कामकाज पार पाडण्यासाठी कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी गाडे यांचा पाच आठवड्यांचा कार्यकाळ कामकाजात कोणताही विस्कळीतपणा न येता नियमित पार पडल्याने नागरिकांच्यातुन समाधान व्यक्त होत आहे.


पाटणसह कराड तालुक्याचा कारभार जवळपास पाच आठवडे प्रांताधिकारी गाडे यांनी सक्षमपणे सांभाळला होता. कराड उपविभागाचा अतिरिक्त पदभार असल्याने पाटण आणि कराड असे दुहेरी कामकाज सांभाळताना तारेवरची कसरत विना तक्रार पार पाडणे एक अवघड जबाबदारी होती कारण कराड दक्षिण आणि उत्तर असा दोन विधानसभा मतदारसंघात मोठी लोकसंख्या नियमित कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात कराड येथील महसूल कार्यालयात दूरदूरच्या ठिकाणावरून येत असतात अशातच पाटण सारखा दुर्गम तालुक्याचा मूळचा पदभार असल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांचीही वक्रदृष्टी होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार होती यामुळे अवघड जबाबदारी लीलया पार पडल्याने प्रांताधिकारी गाडे यांच्या कार्याचे कराड तालुक्यातील जनतेकडून कौतुक होत आहे. 

कराडचा अतिरिक्त पदभार असल्याच्या कालावधीत पाटण येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला , कराड येथील पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडली , रेल्वे भूसंपादनाचे काही दस्त खंडित कालावधी नंतर पुन्हा सुरु झाले.तर १० वी  व १२ वी चे निकाल लागल्याने पाटण सोबतच कराड येथील शेकडो दाखल्याचे फिफो  प्रणाली नुसार वितरण केले आणि मंगळवारी रात्री उशिरा नूतन प्रांत अधिकारी अतुल मेहेत्रे यांना पदभार देऊन पुढील प्रशासकीय कामासाठी शुभेच्छा दिल्या आणि आपल्या मूळ पाटण तालुक्यातील पुढील प्रशासकीय कामकाजासाठी मार्गस्थ झाले  यामुळे अधिकारी कर्तव्यदक्ष असले की पदभार कायमस्वरूपी असो अथवा तात्पुरता काम जनतेच्या भल्यासाठी करता येते हीच बाब प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी निदर्शनास आणली.