पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून

रवले-सुतारवाडी ता. पाटण येथे सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहेत. याप्रकरणी पाटण पोलिसांनी संशयित नराधम आरोपींला ताब्यात घेतले असून या घटनेने पाटणसह सातारा जिल्हा आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे.

पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून

पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून 

जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ : संशयित नराधम आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

पाटण/प्रतिनिधी : 

          रवले-सुतारवाडी ता. पाटण येथे सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहेत. याप्रकरणी पाटण पोलिसांनी संशयित नराधम आरोपींला ताब्यात घेतले असून या घटनेने पाटणसह सातारा जिल्हा आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे. 

         संतोष थोरात असे पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  दरम्यान, या घटनेने रवले- सुतारवाडीसह ढेबेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

          याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील रवले-सुतारवाडी येथील पीडित मृत अल्पवयीन मुलगी बुधवारी 29 रोजी सायंकाळी बेपत्ता झाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत संबंधित मुलीच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. परंतु, ती मिळून आली नाही. त्यानंतर आज गुरुवारी ३० रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास रवले- सुतारवाडी येथे घटनेतील पीडित मृत मुलीच्या घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर ओढ्यात तिचा मृतदेह आढळून आला. 

         याबाबतची माहिती मिळताच ढेबेवाडी, पाटण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुरुवारी 30 रोजी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल, कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे किशोर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. 
 
        दरम्यान, संशयित आरोपी संतोष थोरात याला पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिसरात अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे. या घटनेने ढेबेवाडी परिसरासह पाटण, सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.